टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारी वेटलिफ्टर मिराबाई चानूची चोहो बाजूंनी प्रशंसा केला जात आहे. नुकतेच ती भारतात परतल्यानंतर तिचे जंगी स्वागत करण्यात आले होते. सोशल मीडियावरही नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अशातच आता लहान मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात ती लहान मुलगी मिराबाईप्रमाणे वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओवरही लोकांची जोरदार पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे मिराबाईनेही हा व्हिडिओ शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
मिराबाई चानूची कमेंट
मिराबाईने हा व्हिडिओ शेअर तर केलाच, पण त्यासोबतच तिने या व्हिडिओला एक गोड कॅप्शनही दिले आहे. तिने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “खूप गोंडस, मला हे खूप आवडले.”
So cute. Just love this. https://t.co/IGBHIfDrEk
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021
विशेष म्हणजे व्हिडिओत मुलीच्या मागे टीव्ही सुरू आहे आणि त्यावर मिराबाई वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. (Indian Wrestler Mirabai Chanu The Girl Did Weightlifting The Video Viral On Social Media)
वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे नाव उंचावणारे वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला होता. हाच व्हिडिओ मिराबाईने रिट्विट करत शेअर केला. सतीश यांनी हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली.
मिळालेत इतके व्ह्यूज
ज्युनिअर मिराबाई म्हणून ओळखले जात असलेल्या या मुलीच्या व्हिडिओला ट्विटरवर आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे या व्हिडिओला ४० हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत, तर शेकडो कमेंट्सही मिळाले आहेत.
Junior @mirabai_chanu this s called the inspiration pic.twitter.com/GKZjQLHhtQ
— sathish sivalingam weightlifter (@imsathisholy) July 26, 2021
मिराबाईला मिळणार गोल्ड मेडल?
वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी चीनची वेटलिफ्टर झिहुई हो हिचे डोपिंगविरोधी अधिकाऱ्यांकडून परीक्षण केले जाणार आहे. या परीक्षणात जर ती पॉझिटिव्ह झाली, तर भारताच्या मिराबाई चानूला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल.
नियम काय सांगतात?
नियम सांगतात की, जर कोणताही ऍथलिट डोपिंग टेस्टमध्ये अयशस्वी ठरला, तर रौप्य पदक जिंकणाऱ्या ऍथलिटला सुवर्ण पदकाने सन्मानित केले जाईल. मिराबाई चानूने शनिवारी टोकियो ऑलिंपिकमध्ये वेट लिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवून भारतासाठी पहिल्या पदकाची कमाई केली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?