ऑकलँड। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(24 जानेवारी) पहिला टी20 सामना इडन पार्क येथे पार पडला आहे. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयात श्रेयस अय्यरने नाबाद अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
त्याने या सामन्यात 29 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 58 धावा केल्या. त्यामुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे तो न्यूझीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी शिखर धवन, जसप्रीत बुमराह आणि कृणाल पंड्या यांना न्यूझीलंड विरुद्ध टी20 सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.
शिखरने 2017ला दिल्ली येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सामन्यात 52 चेंडूत 80 धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
तसेच बुमराहला तिरुअनंतपुरम येथे 2017लाच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्याने त्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या.
मागीलवर्षी ऑकलँडलाच झालेल्या टी20 सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्या सामन्यात कृणाल पंड्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार पंड्याला मिळाला होता.
न्यूझीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सामनावीर पुरस्कार मिळवणारे भारतीय –
शिखर धवन – 2017, दिल्ली
जसप्रीत बुमराह – 2017, तिरुअनंतपुरम
कृणाल पंड्या – 2019, ऑकलँड
श्रेयस अय्यर – 2020, ऑकलँड
अय्यर, राहुलचे अर्धशतक; भारताचा न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात मोठा विजय
वाचा👉https://t.co/C0i9dJziFv👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @klrahul11 @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
रोहित शर्माने बाउंड्री लाईनजवळ घेतलेला हा भन्नाट झेल पाहिला का? https://t.co/WvxssUnv79#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @ImRo45
— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020