भारतीय संघाच्या नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकाविरुद्ध दिमाखात झाली. श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात श्रीलंका संघाला यजमानांसोबत 3 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. या मालिकेतील पहिला टी20 सामना मंगळवारी (दि. 03 जानेवारी) वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या तळातील एका जोडीने मोठी भागीदारी करत खास विक्रम नावावर केला.
भारतीय संघ पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला होता. या सामन्यात भारतीय संघाच्या वरच्या फळीने झटपट विकेट्स गमावल्या होत्या. भारताचा अर्धा संघ तंबूत गेला होता. मात्र, भारताच्या तळातील फलंदाजांनी अशी काही खेळी केली की, पाहुण्या संघाला सहावी विकेट मिळालीच नाही. यासह तळातील फलंदाजांच्या जोडीने शानदार भागीदारी रचत खास विक्रमाची नोंद केली.
ती जोडी इतर कुणी नसून दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल (Deepak Hooda And Axar Patel) यांची जोडी आहे. भारतीय संघ एकेवेळी 14.1 षटकात 5 विकेट्स गमावत 94 धावांवर खेळत होता. त्यावेळी मैदानावर हुड्डा आणि पटेल खेळत होते. या दोघांनीही विकेट न गमावता श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देण्यास सुरुवात केली. यावेळी या जोडीने नाबाद 68 धावांची भागीदारी रचली. यावेळी हुड्डाने 35, तर पटेलने 31 धावांचे योगदान दिले.
5⃣0⃣-run stand! 👏 👏
A quickfire half-century partnership between @HoodaOnFire & @akshar2026 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/uth38CaxaP #INDvSL pic.twitter.com/gJAxwL6j2r
— BCCI (@BCCI) January 3, 2023
हुड्डा आणि पटेलचा विक्रम
यासह या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी भारतीय संघाकडून दुसरी सर्वोच्च भागीदारी रचली. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करण्याचा विक्रम विराट कोहली आणि हार्दिक पंड्या (Virat Kohli And Hardik Pandya) या जोडीच्या नावावर आहे. त्यांनी 2021मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना सहाव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी रचली होती.
याव्यतिरिक्त भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी एमएस धोनी आणि युसूफ पठाण यांनी नाबाद 68 धावांची तिसरी सर्वोच्च भागीदारी रचली होती.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी भारताकडून सर्वोच्च भागीदारी
70 धावा- विराट कोहली आणि हार्दिक पंड्या, विरुद्ध- इंग्लंड (2021)
68* धावा- दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल, विरुद्ध- श्रीलंका (2023)*
63* धावा- एमएस धोनी आणि युसूफ पठाण, विरुद्ध- इंग्लंड (2009)
याव्यतिरिक्त या जोडीच्या वैयक्तिक धावांबद्दल बोलायचं झालं, तर हुड्डाने 41, तर पटेलने 31 धावांचे योगदान दिले. (India’s Highest 6th Wicket partnership In T20I see list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईशानच्या नवीन वर्षाची सुरुवात दिमाखात! श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप देत मोडला विस्फोटक सेहवागचा विक्रम
फलंदाजाला गेला नडायला, पण नियम माहिती नसल्याने झम्पाची झाली फजिती; पाहा व्हिडिओ