‘रजत पाटीदार’ची (Rajat Patidar) आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी नाही. परंतु त्याला देशांतर्गत सामन्यांद्वारे भारतीय संघाची जर्सी घालण्याची आणखी एक संधी मिळेल असा विश्वास आहे. या वर्षाच्या सुरूवातीला पाटीदारला इंग्लंडविरूद्ध 6 डावात केवळ 63 धावा करता आल्या. तथापि, रजत पाटीदारने रणजी ट्राॅफी (Ranji Trophy), सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) टी20च्या सुरूवातीच्या टप्प्यात प्रभावी कामगिरी केली आहे.
‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’च्या (Syed Mushtaq Ali Trophy) फायनलच्या पूर्वसंध्येला पाटीदार शनिवारी (14 डिसेंबर) येथे म्हणाला, “भारतीय कसोटी संघात स्थान मिळवून मला चांगले वाटले. तथापि, कधीकधी मला वाईट वाटते की मी संधीचा फायदा घेऊ शकलो नाही. काहीवेळा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत आणि ते ठीक आहे.”
रजत पाटीदार (Rajat Patidar) म्हणाला, “माझ्या मते गोष्टी स्वीकारणे ही यशाची पहिली पायरी आहे. तुमच्या क्रिकेट प्रवासात अपयश येणार हे तुम्हाला मान्य करावे लागेल. त्यामुळे त्याचा सामना करणे आणि त्यातून शिकणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी ते स्वीकारले आहे आणि मी पुढे जात आहे. हा खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. मी पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.”
रजत पाटीदारने (Rajat Patidar) देशांतर्गत स्पर्धांमध्ये सलग धावा करत पहिले पाऊल टाकले आहे. मध्य प्रदेशच्या या कर्णधाराने 5 रणजी सामन्यांमध्ये 53.37च्या सरासरीने 427 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 1 शतक, 1 अर्धशतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
2024 मध्ये अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती, यादीत ‘रोहिराट’चाही समावेश
गाबा कसोटीत टॉस जिंकून भारतानं गोलंदाजी का निवडली? रोहित शर्मानं सांगितलं कारण
“मला संधी मिळाली तर…”, टीम इंडियातील कमबॅकवर अजिंक्य राहणेचं सूचक वक्तव्य