इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याने आयपीएल 2023 पूर्वी मोठी धक्का दिला. इंंडियन प्रीमियर लीग 2023 साठी स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्ज संघाने मोठी रक्कम मोजून खरेदी केले. पण आयपीएलच्या या 16व्या हंगाम स्टोक्स संपूर्ण खेळू शकणार नाही. शेवटच्या काही सामन्यांमध्ये स्टोक्स धोनी ब्रिगेडची साथ सोडणार असल्याचे समोर येत आहे.
बेन स्टोक्स (Ben Stokes) याने माध्यमांशी बोलताना आयपीएल 2023 विषयी ही माहिती दिली. आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याची आणि एशेस 2023ची तयारी करण्यासाठी स्टोक्स आयपीएलच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये मायदेशात परतू शकतो. आयपीएलचा हा आगामी हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार असून अंतिम सामना 28मे रोजी खेळला जाणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार जेव्हा स्टोक्सला आयर्लंडविरुद्धचा कसोटी सामना खेळण्याविषयी विचारले केले, तेव्हा तो या सामन्यासाठी उपलब्ध असेल, असे म्हटला.
स्टोक्सच्या हावाल्याने अशी माहिती दिली गेली आहे की, “होय मी खेळेल. मी हे सुनिश्चित करत आहे की, स्वतःला पुरेसा वेळ देईल आणि आयर्लंडविरुद्धचा सामना खेळे.” आयपीएल 2023 मध्ये भाग घेणार स्टोक्स इंग्लंडचा एकटा खेळाडू नाहीये. जो रूट, मार्क वुड, जॉनी बेयरस्टो, लियान लिविंगस्टोन, जोफरा आर्चर आणि सॅम करन हे इंग्लिश खेळाडूही आयपीएल खेळणार आहेत. अशात हे खेळाडू आयपीएलचा संपूर्ण हंगाम उपलब्ध असतील की नाही हे सथ्यातरी सांगता येणार नाही. स्टोक्स या सर्वांशी आयपीएलविषयी चर्चा करणार आहे.
“मी सर्व खेळाडूंसोबत चर्चा करेल आणि त्यांना विचारेल की, ते ऍशेस मालिकेसाठी तयार राहू इच्छितात? कारण ऍशेसचे हे पाच सामने खरोखर महत्वाचे आहेत. अशात खेळाडूंचा काय विचार आहे, हे पाहावे लागेल,” असे स्टोक्स पुढे म्हणाला. दरम्यान, इंग्लंड संघ सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. याठिकाणी उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने मोठा विजय मिळवला असून दुसरा सामना 24 फेब्रुवारी रोजी सुरू होईल
स्टोक्सला यावर्षी खरेदी करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळला आहे. पण सीएसकेने लिलिवावेळी बाजी मारली आणि स्टोक्सला ताफ्यात सामील केले. तब्बल 16.25 कोटी रुपयांमध्ये सीएसकेने स्टोक्सला संघात घेतले आहे. स्टोक्स यापूर्वी 2017मध्येही एमएस धोनी () सोबत खेळला आहे, जेव्हा रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता. (Information is coming out that Ben Stokes will withdraw from the half of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निवृत्तीच्या 15 दिवसांनंतरच फिंचने घेतला कमबॅकचा निर्णय! पुन्हा पाडणार चौकार-षटकारांचा पाऊस
‘त्याने कोणता गुन्हा केला नाहीये…’, आकाश चोप्रा – वेंकटेश प्रसाद वादानंतर हरभनजची प्रतिक्रिया