भारतीय महिला खेळाडू टोकियो ऑलिंपिक्स २०२० गाजवत आहेत. आतापर्यंत भारताच्या खात्यात दोन पदकांची कमाई झाली आहे. तसेच भारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेनने तिसरे पदकही पक्के केले आहे. ऑलिंपिकच्या सुरुवातीलाच भारताच्या मिराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर रविवारी (१ ऑगस्ट) पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक आपल्या नावावर केले. स्टार बॅडमिंटनपटू सिंधूने हे पदक जिंकून भारतासाठी इतिहास रचला आहे. ती दोन ऑलिंपिक पदकं जिंकणारी पहिलीच महिला खेळाडू बनली आहे. यापूर्वी तिने २०१६ ऑलिंपिक्समध्येही रौप्य पदक जिंकले होते. यानंतर आता तिच्यावर बक्षीसांचा वर्षाव होत आहे.
रविवारी कांस्य पदकाच्या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंगजियाओला २१-१३, २१-१५ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. सिंधूच्या या विजयासोबत संपूर्ण देश आनंद साजरा करत आहे. तिच्या या कामगिरीनंतर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरसह इतर अनेक मोठ्या नेत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (IOA Give 25 Lakh Rupees To Olympic Bronze Medalist PV Sindhu)
New DP:
First Indian woman to win 2 Olympic medals!@Pvsindhu1 🥈🥉 #TeamIndia pic.twitter.com/7kbtgeUJE9
— Team India (@WeAreTeamIndia) August 1, 2021
बक्षीसांचा पाऊस सुरू
सिंधूच्या या विजयानंतर तिच्यावर आता बक्षीसांचा वर्षाव होत आहे. खरं तर भारतीय ऑलिंपिक संघटनेने आधीच घोषणा केली होती की, ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूला ७५ लाख, रौप्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला ४० लाख आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूला २५ लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल.
आता आयओएने भारताची स्टार बॅडमिंटनपटू सिंधूला २५ लाख रुपये बक्षीस रक्कम देणार आहे. आयओएव्यितिरिक्त आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सिंधूला ३० लाख रुपयांचे बक्षीस देणार आहेत. भारत सरकार आणि अनेक राज्य शासनाकडूनही बक्षीसाची घोषणा केली जाऊ शकते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-अरेरे! भालाफेक खेळात क्लालिफायर्समधील खराब प्रदर्शनामुळे अन्नू राणी ऑलिंपिकमधून बाहेर
-हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत
-दणदणीत विजयानंतर तुटले भारताचे ४१ वर्षांनंतर फायनल खेळण्याचे स्वप्न; बेल्जियमकडून ५-२ने पराभव