सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहेच. त्यामुळे यादरम्यान भारतात येणाऱ्या व्यक्तींना आपल्यासोबत आरटी- पीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (Indian Olympic Association) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी खेळ सचिव रवी मित्तल यांनी पत्र लिहिले आहे.
खरं तर या पत्रात मित्तल यांनी विनंती केली आहे की, टोकियो ऑलिंपिकमधून आपल्या खेळानंतर येणाऱ्या भारतीय संघाकडे जोपर्यंत मान्यता कार्ड आहे, त्यांना आरटी- पीसीआर चाचणी अहवालाशिवाय देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली जावी. (IOA Head requests govt to allow Olympic contingent to enter country without COVID-19 RT PCR test report)
त्यांनी पत्रात लिहिले की, “भारत सरकारने देशात येणाऱ्या लोकांना प्रवेशासाठी आपला वैध आरटी- पीसीआर अहवाल दाखवणे बंधनकार केले आहे. हा नियम जपानवरून भारतात येणाऱ्या लोकांवरही लागू आहे. महोदय, आपल्या कार्यालयाच्या माध्यमाला आम्ही विनंती करतो की, भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय, आपत्ती व्यवस्थापनासह किंवा अधिकारी ऍथलिट्स, अधिकारी, आयओए अधिकारी आणि प्रतिनिधींना परवानगी देण्याची जबाबदारी असलेल्या कोणत्याही विभाग किंवा प्राधिकरणाकडे हा मुद्दा उपस्थित करा. एनएसएफचे अधिकारी/प्रतिनिधी आणि मीडिया जो टोकियोमधून परतत आहे आणि त्यांच्याकडे एक मान्यता कार्ड आहे.त्याआधारे जपानने त्यांना त्यांच्या देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. त्यांना आरटी- पीसीआर चाचणी अहवालाशिवाय भारतात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी.”
पुढे त्यांनी भारत सरकारला जपान सरकारला याबाबत कळवण्याचीही विनंती केली आहे. त्यांनी म्हटले पुढे लिहिले की, “आमची विनंती आहे की, भारत सरकारकडून जपान सरकारला एक पत्र पाठवण्यात यावे. त्यामध्ये वरील उल्लेखाप्रमाणे सर्व ऍथलिट आणि इतर लोक, ज्यांच्याकडे मान्यता कार्ड आहे, त्यांना कोव्हिड- १९च्या चाचणीशिवाय जपानमधून भारतात येण्यासाठी परवानगी द्यावी. तसेच भारतातही त्यांना वाट न पाहण्याची परवानगी दिली जावी.”
आयओए प्रमुखांना विनंती करण्यामागील कारण म्हणजे आरटी- पीसीआरची तपासणी करण्यात येणारी समस्या आणि भ्रम आहे. त्यांंनी म्हटले की, “टोकियोमध्ये किंवा टोकियोच्या बाहेर आरटी- पीसीआरची चाचणी करणे खूपच कठीण आहे. इथे कागदोपत्री कारवाई योग्य आहे, पण व्यवहारात खूपच भ्रम आहे. तसेच गोष्टी मिळवणेही खूप कठीण आहे.”
SILVER FOR MIRABAI!!
We're off to a great start as our star weightlifter @mirabai_chanu clinches the first Silver for India at the #TokyoOlympics in the 49kg category.@PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @ddsportschannel @WeAreTeamIndia @PIB_India pic.twitter.com/s0r96b7LaK
— SAI Media (@Media_SAI) July 24, 2021
टोकियोमध्ये भारतीय गटातील प्रत्येक सदस्य, अधिकारी, आयओए आणि एनएसएफच्या प्रतिनिधिंना प्रत्येक दिवशी भारतात जाण्यासाठी चाचणी करावी लागते. त्यांनी याचाही उल्लेख केला आहे की, रौप्य पदक विजेत्या मिराबाई चानू सोमवारी (२६ जुलै) भारतात येतील.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ