आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने फिरकी गोलंदाज सुनिल नरेनबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, नरेन गोलंदाजीच्या आपल्या नवीन पद्धतीने आयपीएल २०२० मध्ये फलंदाजांना चिंतेत टाकताना दिसू शकतो. नरेनने गंभीरच्या नेतृत्वात केकेआर संघाचे बराच काळ प्रतिनिधित्व केले आहे. नरेन आयपीएलमध्ये केकेआर संघासाठी खूपच महत्त्वपूर्ण खेळाडू राहिला आहे. त्याने सध्या सुरू असलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या नवीन गोलंदाजी पद्धतीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना म्हटले, “माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा नरेन रन- अपदरम्यान चेंडू लपवेल, तेव्हा तो फलंदाजांच्या चिंतेत भर घालू शकतो. हे ओळखणे कठीण होईल की, कोणता चेंडू बाहेर जाईल आणि कोणता आत येईल. कारण तुम्ही जितका वेळ चेंडू हातात ठेवलेला पाहाल, तितकेच फलंदाजांसाठी कठीण ठरणार आहे. जर नरेनने युएईच्या खेळपट्टीवर थोडीशी पकड जरी बनविली, तर तो खूप प्रभावी सिद्ध होईल.”
केकेआरचा माजी कर्णधार गंभीरने म्हटले की, “राशिद आपल्या वेगामुळे यशस्वी झाला आहे आणि नरेनही जेव्हा अशाप्रकारे गोलंदाजी करतो, तेव्हा तो यशस्वी होतो. ही नवी गोष्ट आहे जी आपण पाहत आहोत आणि कदाचित यामुळे नरेन या आयपीएलमध्ये यशस्वी होईल.”
नरेन आपल्या गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही चमकदार कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. नरेनने आयपीएलमध्ये आतापर्यंत ११० सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने २३.३१ च्या सरासरीने १२२ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत युएईत होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-डेव्हिड वॉर्नरने या विक्रमाच्या यादीत मिळवले तिसरे स्थान; आता केवळ रोहित, विराट आहेत पुढे
-इंग्लंड विरुद्ध खराब गोलंदाजी केली ॲडम झाम्पाने; पण ट्रोल झाला आरसीबी संघ
-अखेर चाहत्यांना झाले धोनीचे दर्शन; सीएसकेची सरावाला सुरुवात
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स
-वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा
-आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग