fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डेव्हिड वॉर्नरने या विक्रमाच्या यादीत मिळवले तिसरे स्थान; आता केवळ रोहित, विराट आहेत पुढे

September 5, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । तीन सामन्यांच्या टी -20 मालिकेतील शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला दोन धावांनी पराभूत केले. सामन्यात एकेकाळी असे वाटत होते की, ऑस्ट्रेलिया संघ हा सामना सहज जिंकेल, परंतु अत्यंत रोमांचक सामन्यात संघ केवळ दोन धावांनी पराभूत झाला. यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  इंग्लंडचा डेव्हिड मलान त्याच्या शानदार खेळीसाठी ‘सामनावीर’ म्हणून निवडला गेला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वोत्कृष्ट फलंदाजी करत शानदार अर्धशतक ठोकले.  त्याने 47 चेंडूत 58 धावा केल्या, पण त्याची ही खेळी संघाला जिंकून देण्यात अपयशी ठरली. मात्र या खेळीदरम्यान वॉर्नरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात बर्‍याच दिवसानंतर मैदानात परत आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाच्या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात दिली. फिंच आणि वॉर्नरने 11 षटकांत पहिल्या विकेटसाठी 98 धावांच्या मजबूत भागीदारी रचली, परंतु त्यानंतरचे फलंदाज धावा करू शकले नाहीत आणि याचा परिणाम म्हणून संघास पराभवास सामोरे जावे लागले.

58 धावांच्या खेळीमुळे डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधे सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगला या यादीत मागे टाकले आहे. स्टर्लिंगने १८ वेळा ५० धावांचा टप्पा आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधे पार केला आहे. या यादीत पहिल्या दोन क्रमांकावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 25 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे, तर विराटने 24 अर्धशतके ठोकली आहेत.

ऍरोन फिंचचे 2000 धावा पूर्ण

इंग्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरोन फिंचने आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन तर जगातील दहावा क्रिकेटर आहे. त्याच्या आधी त्याचा सहकारी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये दोन हजार पूर्ण केल्या आहेत. या यादीमध्ये सर्वात पुढे भारताचा कर्णधार विराट कोहलीचे नाव असून त्याच्या नावावर 2794 धावा आहेत.

या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आता पुढील सामन्यावर लक्ष ठेवून आहे. मालिकेत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना दुसरा सामना जिंकावा लागेल. या मालिकेचा दुसरा सामना रविवारी साऊथॅम्प्टनच्या एजिस बाऊल येथे खेळला जाईल.

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा प्रज्ञान ओझा

आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग

…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर चाहत्यांना झाले धोनीचे दर्शन; सीएसकेची सरावाला सुरुवात

६ षटकार ठोकत सिमन्सने केल्या ९६ धावा, नाईट रायडर्सने मिळविला सलग ८ वा विजय

आयपीएलमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जॉन्टी र्‍होड्सने केली ‘ही’ विशेष मागणी


Previous Post

इंग्लंड विरुद्ध खराब गोलंदाजी केली ॲडम झाम्पाने; पण ट्रोल झाला आरसीबी संघ

Next Post

आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी नाकी नऊ आणण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजाचा मास्टर प्लॅन तयार

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

आयपीएलमध्ये फलंदाजांसाठी नाकी नऊ आणण्यासाठी केकेआरच्या गोलंदाजाचा मास्टर प्लॅन तयार

भारतात परतलेला सुरेश रैना परत दिसणार आयपीएलमध्ये, पण...

एका पराभवाने व्यथित झालेल्या देशाला धोनी हवा आहे फिनीशर म्हणून संघात

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.