कोलकाता | शुक्रवारी कोलकाताच्या इडन गार्डनवर आयपीएल २०१८मधील प्ले-आॅफचा शेवटचा सामना झाला. अंतिम सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
यावर्षी ९ सामने आयोजीत करण्याचा मान मिळालेल्या इडन गार्डनला आयपीएल २०१८मधील Best Venue and Ground of IPL 2018 अर्थात या वर्षीच्या सर्वोत्तम स्टेडियमचा मान मिळाला.
याची माहिती बंगाल क्रिकेट असोशियशनचा (कॅब) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिली आहे.
“कॅबला आयपीएलकडून गौरविण्यात आले आहे. मला कळविण्यात आनंद होत आहे की इडन गार्डनला यावर्षीचा आयपीएलमधील सर्वोत्तम स्टेडियमचा मान मिळाला आहे. आम्ही सर्वजणांचे या माध्यमातून आभार मानत आहोत. ” असे गांगुलीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
CAB GETS IPL HONOURS
The CAB is happy to inform that Eden Gardens has once again been awarded the best venue and ground of IPL 2018.
The CAB takes this opportunity to thank all who have contributed to this success beginning with the ground staff, @bcci@icc
— Sourav Ganguly (@SGanguly99) May 25, 2018
यावर्षी या स्टेडियमला एकुण ९ सामने आयोजीत करण्याचा मान मिळाला. त्यातील ७ सामने हे कोलकाता संघाचे साखळी सामने होते तर २ सामने हे प्ले-आॅफच्या लढतीचे होते. हे २ सामने आधी पुण्यात होणार होते.
काल हैद्राबाद विरुद्ध कोलकाता सामन्याला इडन गार्डनला तब्बल ६३, ८४८ प्रेक्षकांना हजेरी लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही!
–मोठा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर
–कोणते संघ किती वेळा गेले आहेत आयपीएल फायनलमध्ये?
–जे आयपीएल २०१७मध्ये झालं तेच २०१८मध्ये होणार का?
–बापरे! कालच्या सामन्यानंतर एवढं कौतुक आलं राशीदच्या वाट्याला
–अखेर आयपीएलला मिळाला दुसरा सुपरमॅन, केला असा काही कारनामा की ऐकतच