fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी दिग्गज म्हणतो, आरसीबीने या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे, तरच….

IPL 2020 Aakash Chopra Highlights Glaring Weaknesses In Royal Challengers Bangalore Squad

September 15, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/RCBTweets

Photo Courtesy: Twitter/RCBTweets


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२०) १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. यावर्षी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळली जात असून अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आपला पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद बरोबर खेळणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने आरसीबीच्या कमतरतेविषयी सांगितले आहे.

आकाशने यूट्यूब चॅनल ‘आकाशवाणी’वर बोलताना सांगितले की, आरसीबीची अंतिम षटकातील गोलंदाजी व फलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी समस्या आहे. “आरसीबीत काही कमतरता आहेत. हे खरं आहे की जर पहिल्या सामन्यांमध्ये आपण मागे राहिला, तर आपण कायमच मागे राहतो. कारण आपल्याला लिलाव किंवा ट्रेडिंग विंडोतून खेळाडू विकत घ्यायचे असतील तरी त्यामध्ये तफावत कायम राहते. आणि ती भरण्यासाठी योग्य खेळाडू मिळत नाहीत.”

पुढे बोलताना आकाश म्हणाला, “त्यांची एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे अंतिम षटकात फलंदाजी. जर विराट कोहली आणि एबी डिविलियर्स शेवटपर्यंत खेळत असतील तर ते चांगले आहे. परंतु ते खेळत नाहीत तर त्यांना पर्याय नाही. ही चिंतेची बाब आहे. त्यांच्याकडे मोईन अली, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि ख्रिस मॉरिस असले तरी त्यांना संघाला साजेशी खेळी करता आलेली नाही.”

“शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर हेदेखील भारताकडून खेळले आहेत, त्यांनी धावाही केल्यात, ते अनुभवी आहेत. तर मोईन अलीला खालच्या क्रमांकावर खेळवायला हवं . ख्रिस मॉरिसबरोबर त्याची जोडी जमू शकेल. संघाची अन्य मोठी समस्या अंतिम षटकात गोलंदाजी करणे ही आहे. मॉरिस हा अंतिम षटकातील चांगला गोलंदाज नाही. तर डेल स्टेनचीही तीच अवस्था आहे. आपल्याकडे नवदीप सैनी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज आहेत, पण त्यांना आवश्यक तेवढा आत्मविश्वास दिला गेला नाही. की त्यांना जेवढी मिळण्याची गरज आहे,” असेही आकाश चोप्रा म्हणाला.

आरसीबीने अद्याप आयपीएलचे एकही विजेतेपद पटकावले नाही. युएईमधील परिस्थिती संघाला अनुकूल ठरेल असा विश्‍वास क्रिकेट पंडितांना आहे. ऍरॉन फिंचच्या आगमनामुळे संघाची फलंदाजीही बळकट झाली आहे. कदाचित संघाचे भाग्य बदलू शकेल.

आरसीबीचा संपूर्ण संघ खालीलप्रमाणे-

विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, देवदत्त पड्डिकल, पार्थिव पटेल, आरोन फिंच, जोशुआ फिलिप, शहबाज अहमद, गुरुकीरत सिंह मान, पवन देशपांडे, मोइन अली, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, इसुरु उदाना, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, अ‍ॅडम झाम्पा, आणि डेल स्टेन

महत्त्वाच्या बातम्या-

-खुशखबर: मार्चनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळणार प्रेक्षकांचा जल्लोष, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने…

-आयपीएल सुरू होण्यापूर्वी या खेळाडूने केली सिंहगर्जना; म्हणाला, आम्हीच जिंकणार आयपीएलचे जेतेपद

-माजी दिग्गजही झाला विंडीजच्या ‘या’ खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी

ट्रेंडिंग लेख-

-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय

-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान


Previous Post

पीसीबीने शोएब अख्तरला दाखवला ठेंगा; ‘हा’ माजी खेळाडू राहणार पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर

Next Post

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विरुद्ध न खेळणे दिलासा देणारी गोष्ट असेल; पहा कोण म्हणतंय

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Screengrab : Twitter/@cricketcomau
क्रिकेट

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आख्खं मार्केट आता आपलंय.! ऐतिहासिक विजयानंतर भारतासाठी आनंदाची बातमी; टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विरुद्ध न खेळणे दिलासा देणारी गोष्ट असेल; पहा कोण म्हणतंय

Photo Courtesy: Twitter/ IPL

आरसीबीच्या 'या' फिरकीपटूला करायची आहे, अंतिम षटकात गोलंदाजी, कारण जाणून थक्क व्हाल...

Photo Courtesy: Twitter/ ICC

टीम इंडियाच्या या खेळाडूच्या पत्नीला हवीय सुरक्षा, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.