मुंबई । आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये सुरू होईल. यावेळी कोविड 19 साथीमुळे खेळाडूंना जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात रहावे लागेल. यावर्षी आयपीएल दरम्यान खेळाडूंना जबाबदारीने काम करावे लागणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने खेळाडूंना एका अजब सल्ला दिला आहे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये राहून कंटाळा आला असेल तर त्यांनी गिटार वाजवायला शिकले पाहिजे, असे ली ने सांगितले.
स्टार स्टार स्पोर्ट्स शो ‘क्रिकेट कनेक्टेड’ मध्ये ली म्हणाला की, “तुमच्या आरोग्यासाठी सर्वात आधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक अंतर राखणे आणि कोविड 19 च्या मानकांचे पालन करणे होय, म्हणून मला असे वाटत नाही की कोणत्याही खेळाडूला बाहेर जाऊन आपण चुकीचे करावे असे वाटत नसेल. कारण जर आयपीएल झाले नाही तर ते खूपच नुकसान होईल.”
ब्रेट ली म्हणाला की, “जगभरातील लोकांना क्रिकेट बघायचे आहे, ते खेळाला मिस करत आहेत. मला विश्वास आहे की सर्व खेळाडू, अर्थातच अगदी क्रिकेटर्सदेखील ते योग्य गोष्टी करत असल्याचे सुनिश्चित करतील. याचा अर्थ ते नियमांनुसार खेळतील आणि या ‘जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणामध्येच राहतील.”
कसोटी आणि वनडेमध्ये 300 हून अधिक विकेट्स घेतलेला ली हा ‘रॉक बँड’ ‘सिक्स अँड आऊट’चा भाग असून गिटार वाजवतो. तो म्हणाला, “हे पाहा, ही नऊ आठवड्यांची स्पर्धा आहे आणि त्यासाठी त्यांना चांगले पैसे दिले जात आहेत, जे चांगले आहे, या आठ आठवड्यांत गिटार शिका. मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये खेळायला आवडते, मला बाहेर जाऊन गोल्फ खेळायची गरज नाही. कंटाळा येत असेल तर आपले गिटार बाहेर काढायचे किंवा काही कार्ड गेम (पत्ते) खेळायचे, आनंद घ्यायचा.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारताला निर्माण झाला हा धोका
आयसीसी क्रमवारीत ख्रिस वोक्सची मोठी झेप; आर अश्विनला धोका
१३ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेने कसोटीत केला होता अजब कारनामा
ट्रेंडिंग लेख –
या १० फलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये मारलेत सर्वाधिक षटकार; एका भारतीयाचाही आहे समावेश
आयपीएलमध्ये एकही षटकार मारता न आलेले 3 खेळाडू
अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार