आयपीएलच्या 13 व्या हंगामात इतिहासात आतापर्यंत जे घडले नव्हते ते शुक्रवारी (23 ऑक्टोबर) घडले. मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला संघाला दहा गड्यांनी लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. चेन्नईविरुद्ध एखाद्या संघाने इतका मोठा विजय मिळवण्याची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. तसेच चेन्नईचा या हंगामातील हा 11 सामन्यांतील 8 वा पराभव आहे.
दिग्गज फलंदाज एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा हा करा अथवा मरा स्थितीचा सामना होता. मुंबईचा कर्णधार कायरान पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईने केवळ 3 धावांत 4 गडी गमावले.चेन्नईच्या खराब सुरूवातीनंतरही अष्टपैलू सॅम करनच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने सन्मानजनक 114 धावा केल्या होत्या. त्यानंतर 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज अर्धशतक ठोकले. मुंबईने केवळ 12.2 षटकांतच हे लक्ष्य गाठले.
पहिल्यांदाच चेन्नईचा एवढा मोठा पराभव
या हंगामात चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 10 गडी राखून विजय मिळविला होता. पण आता चेन्नईलाच 10 गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईला आयपीएलमध्ये 10 गडी राखून पराभूत करणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला चेन्नई विरुद्ध 10 गड्यांनी विजय मिळवता आला नव्हता.
तसेच आयपीएलमध्ये 10 गडी राखून विजय मिळवण्याची मुंबईची ही दुसरी वेळ आहे. त्यांनी याआधी 2012 मध्ये राजस्थानविरुद्ध 10 गडी राखून मोठा विजय मिळविला होता.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 10 गडी राखून विजय मिळवण्याची घटना 13 वेळा घडली आहे. यातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरन सर्वाधिक 3 वेळा 10 गडी राखून विजय मिळवला आहे. तर चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 2 वेळा 10 गडी राखून विजय मिळवला आहे.
एवढेच नाही तर चेन्नई संघ पहिल्यांदाच आयपीएल हंगामातील साखळी फेरीत 8 सामने पराभूत झाला आहे.
चेंडूंच्या तुलनेतही चेन्नईचा मोठा पराभव –
चेंडूंच्या तुलनेतही चेन्नईचा हा मोठा पराभव आहे. मुंबईने चेन्नईला 46 चेंडू बाकी ठेवत पराभूत केले. याआधी दिल्ली डेअरडेविल्सने (दिल्ली कॅपिटल्स) 2012 ला 40 चेंडू राखून चेन्नईला पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम
-राहिलेल्या ३ मॅच खेळणार का? पाहा काय होते धोनीचे उत्तर
-‘जिंकणारा संघ नव्हे हा तर वृद्ध कल्याण केंद्र’, माजी क्रिकेटरची सीएसकेवर बोचरी टीका
ट्रेंडिंग लेख-
-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला