आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 38 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघादरम्यान खेळला गेला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा आयपीएलच्या कारकिर्दीतील हा 200 वा सामना होता. या सामन्यात राजस्थानचा स्टार फलंदाज जॉस बटलर याने 70 धावांची दमदार खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र सामन्यानंतर धोनीने त्याला एक खास भेटवस्तू दिली.
धोनीने आपल्या कारकिर्दीतील 200 व्या सामन्यातील जर्सी बटलरला भेट म्हणून दिली. धोनीची जर्सी हातात घेऊन उभा असलेल्या बटलरचा फोटो आयपीएलच्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
धोनीने या सामन्यात फलंदाजीत काही खास कामगिरी केली नाही. तो 28 चेंडूत 28 धावा काढून बाद झाला. सीएसके 20 षटकांत पाच गडी गमावून 125 धावा करू शकला. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 30 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त अष्टपैलू सॅम करनने 22 धावा केल्या.
या सामन्यात धोनी फलंदाजीत काही खास कामगिरी करू शकला नसला, तरी त्याने यष्टीमागे घेतलेल्या अफलातून झेलमुळे हा सामना नेहमीच त्याच्या स्मरणात राहील.
प्रत्युत्तरादाखल राजस्थान रॉयल्सने 17.3 षटकांत 3 बाद 126 धावा करून सामना जिंकला. राजस्थानकडून जॉस बटलरने 48 चेंडूत नाबाद सर्वाधिक 70 धावा केल्या. त्याशिवाय कर्णधार स्टीव्ह स्मिथ 26 धावा करून नाबाद राहिला. डावाच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सने 28 धावांत तीन गडी गमावले. परंतु त्यानंतर बटलर आणि स्मिथने चौथ्या गड्यासाठी 98 धावांची भागीदारी करून संघाला शानदार विजय मिळवून दिला.
https://www.instagram.com/p/CGiNr2nlcSq/?utm_source=ig_web_copy_link
राजस्थान रॉयल्सकडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी, फिरकीपटूं श्रेयस गोपाल आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईविरुद्धच्या झुंजारू खेळीदरम्यान बटलरने केला खास विक्रम; रहाणे, वॉटसननंतर ठरला तिसरा फलंदाज
-‘ही माझी शेवटची संधी…’, चेन्नईविरुद्ध केलेल्या दमदार खेळीनंतर बटलरची प्रतिक्रिया
-‘करो या मरो’ सामन्यात राजस्थानने रोखला चेन्नईचा विजयरथ, प्लेऑफच्या आशा पल्लवित
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’