आज (२ ऑगस्ट) आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक पार पडली असून यामध्ये आयपीएलबाबत २०२० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याच्या निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये १० डबल हेडर (एका दिवशी २ सामने) असतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळचे सामने संध्याकाळी ७.३० वाजता सामने सुरू होतील.
आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळताना पाहायला मिळेल.
“आम्ही ठरवले आहे की यावेळी १० नोव्हेंबरपर्यंत स्पर्धा होईल आणि त्यामुळे यावेळी अंतिम सामना पहिल्यांदाच रविवारी होणार नाही. तसेच प्रवास आणि बायो सिक्यूअर वातावरण लक्षात घेऊन सामन्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवण्यात आले आहे. हे सर्व लक्षात घेऊन यावेळी १० डबल हेडर ठेवण्यात आले आहेत,” असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
“आम्ही आयपीएलच्या नियमित वेळेत बदल केला असून सामना ३० मिनिटे आधी खेळविण्याचे ठरविले आहे. संध्याकाळचे सामने ८ ऐवजी ७.३० वाजता सुरुवात करू.”
बैठकीत प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाली का असे विचारले असता, अधिकारी म्हणाले की, अमिराती क्रिकेट बोर्डाशी(ईसीबी) सल्लामसलत करून या गोष्टींची काळजी घेतली जाऊ शकते.
“खेळाडूंचे मनोबल निश्चितच वाढेल म्हणून काही चाहते येणं हे खूप छान ठरेल. परंतु लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणे. म्हणून या गोष्टींबाबत आम्ही ईसीबीशी योग्य वेळी चर्चा करणार आहोत,” असेही अधिकारी पुढे म्हणाले.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी आयएएनएसला सांगितले की, “बीसीसीआयला क्रीडा मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून आम्हाला लवकरच इतर विभागांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
-असा एक दूर्दैवी क्रिकेटपटू जो आज असता एक महान अष्टपैलू, पण तेव्हा…
-अनिल कुंबळेनी ‘मंकीगेट’ प्रकरणावर केले मोठे भाष्य; म्हणाला…
-वाढदिवस विशेष : आपले रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवणारा वेस्ट इंडिजचा दिलदार दिग्गज
ट्रेंडिंग लेख –
-४ असे प्रसंग जेव्हा बांगलादेशी खेळाडू त्यांच्या कृत्यामुळे ठरले हास्यास पात्र…..
-लग्न न करताच वडील होणारे हे आहेत ४ क्रिकेटपटू
-या ५ गोलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासात टाकले आहेत सर्वाधिक डॉट बॉल