ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने ३ वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू सॅम करनबद्दल मोठे विधान केले आहे. हॉगच्या मते सॅम करनला चेन्नई संघाने वरच्या फलंदाजी फळीत सामील केले पाहिजे.
हॉगच्या मते, सुरेश रैनाच्या अनुपस्थितीत सॅम करन तिसऱ्या क्रमांकावर चांगला पर्याय ठरू शकतो. तो यापूर्वी अनेक टी२० फ्रँचायझी संघाकडून या क्रमांकावर खेळला आहे. जर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले, तर चेन्नईच्या फलंदाजी फळीला मजबूती मिळेल.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना हॉग म्हणाला, “मी सॅम करनला खालच्या फळीतून काढून वरच्या फळीत तिसऱ्या क्रमांकावर खेळवेल. हा डावखुरा खेळाडू वरच्या फळीतील सर्व उजव्या हाताच्या खेळाडूंवर भारी पडेल. कारण यापूर्वी तो इंग्लंड आणि इतर टी२० फ्रँचायझीसाठी खेळला आहे.”
करनला चेन्नई सुपर किंग्सने लिलावात ५.५० कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १६ सामने खेळले आहेत. यात त्याने १६३ धावा केल्या आहेत. सोबतच गोलंदाजीमध्ये त्याने १८ विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई संघ आयपीएल २०२० मध्ये चांगली कामगिरी करताना दिसत नाही. त्यांनी आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. यात त्यांनी केवळ २ सामन्यात विजय मिळवला आहे, तर उर्वरित ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
चेन्नईचा आठवा सामना मंगळवारी (१३ ऑक्टोबर) दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकच मारला पण सॉलिड.! पाहा कोणत्या भाग्यवंताने मारलाय चेन्नईकडून १ हजारावा षटकार
-चेन्नई-हैदराबाद सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान
-IPL 2020: आज चेन्नई-हैदराबाद येणार आमने सामने, पाहा सामन्याबद्दल सर्वकाही
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म