मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 13 वा सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होईल. अबूधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. मागील पराभवाचे दुःख विसरून दोन्ही संघ नव्या जोमाने मैदानात उतरतील आणि लय मिळविण्याचा प्रयत्न करतील. रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सला 224 धावांचे लक्ष्य दिले, पण तरीही त्यांचा पराभव झाला. ज्याचा संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
दुसरीकडे, कायरन पोलार्ड आणि ईशान किशनच्या शानदार डावामुळे मुंबईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 202 धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी सुपर ओव्हरमधून सामन्याचा निकाल आला. ज्यात मुंबईचा पराभव झाला. परिणामी संघाने दोन गुण गमावले. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत या हंगामात खेळलेल्या ३ सामन्यांपैकी पहिला सामना गमावला, परंतु कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करून पुनरागमन केले. तथापि, आरसीबीविरूद्धच्या छोट्या चुकांमुळे त्यांचा पराभव झाला.
किंग्ज इलेव्हन पंजाबचीही अशीच परिस्थिती आहे. ज्यांनी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावल्यानंतर आरसीबीविरुद्ध आपले विजयाचे खाते उघडले होते, पण राजस्थान विरुद्ध त्यांनी सर्वोत्तम फलंदाजी करूनही सामना गमावला. पंजाबने यापूर्वी ज्या काही चुका केल्या त्या आता टाळाव्या लागतील. मागील दोन सामन्यात संघ मजबूत स्थितीत असतानाही त्यांना त्याचा फायदा घेता आला नाही.
पंजाबचे गोलंदाज राजस्थानविरूद्धच्या सामन्यात लयीत दिसले नाहीत. राहुल तेवतियाने शेल्डन कॉट्रोलच्या एका षटकात पाच षटकार ठोकले. अगदी फॉर्मामध्ये असलेल्या मोहम्मद शमीने चार षटकांत 53 धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतले. लेगस्पिनर रवी बिश्नोई वगळता कोणताही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. कर्णधार केएल राहुलने मात्र अत्यंत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपल्या गोलंदाजांच्या उत्साहाला प्रोत्साहन दिले. आता त्याला त्याच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला पंजाबने अद्याप संधी दिली नाही
पंजाबने अद्याप स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला संधी दिली नाही. परंतु राहुल आणि मयंक अगरवालच्या शानदार कामगिरीमुळे त्याची फलंदाजी मजबूत दिसते. मुंबईला सामना जिंकायचा असेल तर त्या दोघांना स्वस्तात बाद करावा लागेल. राहुल आणि अगरवाल या दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतक ठोकले आहे. राजस्थानविरुद्ध त्यांनी पहिल्या विकेटसाठी 183 धावांची भागीदारी केली.
मुंबईची फलंदाजी आणि गोलंदाजी बर्यापैकी संतुलित दिसत आहे. त्यांच्याकडे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्यासारखे वरच्या फळीतील फलंदाज आहेत. त्यानंतर पोलार्ड आणि हार्दिक पंड्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत.
त्याचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा फॉर्म मुंबईकरांसाठी अजूनही चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये सातत्य नसल्याचे दिसून आले. बुमराहने तीन सामन्यांत तीन गडी बाद केले असून तो प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला आहे.
दोन्ही संघ:
किंग्ज इलेव्हन पंजाबः केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पूरन, ईशान पोरेल, अर्शदीप सिंग, मुरुगन अश्विन, कृष्णाप्पा गौतम, हरप्रीत ब्रार, दीपक हूडा, ख्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंग, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंग, जगदीश सुचित, तजिंदर सिंग, हार्डस व्हिलोजेन.
मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तारे, अनमोलप्रीतसिंग, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, मिशेल मॅक्लॅघन, मोहसीन खान, नॅथन कुल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरेफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.