आयपीएल २०२०चा २६ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना राजस्थानने ५ विकेट्सने जिंकला. या हंगामातील त्यांचा हा तिसरा विजय होता. या सामन्यादरम्यान राजस्थानचा फलंदाज राहुल तेवतिया आणि हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद यांच्यात शाब्दिक वाद पाहायला मिळाला.
झाले असे की, रियान परागने शेवटच्या २० व्या षटकाच्या शेवटच्या २ चेंडूत २ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी परागने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला आणि सामना जिंकल्याबद्दल डान्स करत आनंद व्यक्त करू लागला. परंतु तेवतिया आणि खलील यांच्यात शेवटच्या षटकादरम्यान काहीतरी घडले आणि त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर तेथे पोहोचला.
वॉर्नरने तेवतियाला शांत करण्याचा प्रयत्न केला. वॉर्नरने मध्यस्थी केल्यानंतर तेवतिया शांत झाला. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.
There was some heat between Rahul Tewatia and Khaleel Ahmed in the final over, David Warner straight after the match came towards Tewatia and had words with him. Amazing from Warner to sort small issues out right there. pic.twitter.com/J1j6gSsWIu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2020
Khaleel Ahmed & Tewatia Godava padindi so ala … #DavidWarner #RahulTewatia #RRvsSRH #SRHvRR #SRH #RR #Sunrisers #RajasthanRoyals #ipl2020 #Dream11IPL @DRSofficialpage #DRS pic.twitter.com/Sa81bvaWvI
— DRS – Daily Recreation Service (@DRSofficialpage) October 11, 2020
https://twitter.com/Rango93261650/status/1315303337852452864
— Jitzmsdian03 (@jitzvijan03) October 11, 2020
तेवतियाने परागसोबत सहाव्या विकेटसाठी ८५ धावांची खेळी केली. तेवतिया आणि परागने राजस्थानच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने २८ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ४५ धावा कुटल्या. त्यानंतर परागनेही २६ चेंडू खेळत ४२ धावा केल्या. त्यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
-अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
-बेंगलोरविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर ‘या’ माजी क्रिकेटरचा रायडूवर चढला पारा, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा