आयपीएल 2020 मधील 22 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 6 गडी गमावून 201 धावा केल्या. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला 132 धावा करता आल्या आणि हैदराबादने हा सामना 69 धावांनी जिंकला.
पंजाबतर्फे 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरनने मोठे फटके खेळून सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. त्याने 37 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी केली. पण त्याला फिरकीपटू राशिद खानने बाद केले. मात्र याचवेळी पंजाबचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. त्याला 12 चेंडूत 7 धावाच करता आल्या. हैदराबादचा गोलंदाज राशिदने या सामन्यात 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी हैदराबादकडून जॉनी बेअरस्टोने 97 आणि कर्णधार डेविड वॉर्नरने 52 धावांची खेळी केली होती. त्यामुळे हैदराबादला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले.
या सामन्यानंतर चांगल्या कामगिरीमुळे पुरन, राशिद खान यांचे ट्विटरवर कौतुक होत आहे तर खराब कामगिरी करणाऱ्या मॅक्सवेलची लोकांनी खिल्ली उडवली आहे.
Easy to understand why @rashidkhan_19 is the most covered spinner in T20 cricket played anywhere. Great control, great skills, doesn’t give away too many runs, regularly picks up wickets, usually the important ones
— Cricketwallah (@cricketwallah) October 8, 2020
A little reminder tonight of what Nicholas Pooran could be. If you knew him you'd like him to.
— Ian Raphael Bishop (@irbishi) October 8, 2020
The ability to bowl wicket-taking deliveries in a T20 games without leaking a lot of runs. Rashid Khan is a phenomenon in this format. In a league of his own. #SRHvsKXIP #SRH
— Aakash Chopra (@cricketaakash) October 8, 2020
https://twitter.com/aka_viratfan/status/1314254523645546498?s=19
#SRHVSKXIP
After Maxwell's Runout ???????????????? pic.twitter.com/0qJT2kWU9k— Pooja (@PoojaRahate_) October 8, 2020
https://twitter.com/cullenlovesmen/status/1314248930109149184?s=19
https://twitter.com/BajwaKehtaHai/status/1314254138386063364?s=19
https://twitter.com/AjayPanwar3242/status/1314255610104479747?s=19
https://twitter.com/VickyVjMsd/status/1314253036290666496?s=19
https://twitter.com/chetannarula/status/1314259328858091520?s=19
पंजाब संघाचा हा 6 सामन्यांमधील 5 वा पराभव होता. त्यामुळे सध्या तो गुणतालिकेत तळाला आहेत. तर हैदराबादने 6 सामन्यांपैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे आणि 3 सामन्यात पराभव स्विकारला आहे. ते सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा – सायना नेहवाल, पी कश्यपची स्पर्धेतून माघार
IPL 2020: हैदराबाद विरुद्ध पंजाब सामन्यानंतरची जाणून घ्या ‘ही’ खास आकडेवारी






