बहुप्रतिक्षित आयपीएल २०२० सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. या स्पर्धेच्या काही दिवस आधी सीएसकेचे १३ सदस्य कोरोना बाधित असल्याने चेन्नईच्या फ्रेंचायझीला मोठा धक्का बसला होता. त्यातही त्यांचा उपकर्णधार सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी वैयक्तिक कारणे सांगून आयपीएलमधून माघार घेतली.
शुक्रवारी हरभजनने आपल्या फ्रँचायझीला आपल्या निर्णयाची माहिती दिली. आता चेन्नईला हरभजनची जागा भरुन काढण्यासाठी एखादा खेळाडू शोधावा लागेल. तसे, चेन्नईकडे इम्रान ताहिर, मिशेल सँटेनर, रविंद्र जडेजा हे फिरकीपटू आहेत. पण तरीही हरभजनचा अनुभव मोठा होता. तसेच ताहिर आणि सँटेनर परदेशी खेळाडू असल्याने आणि अंतिम ११ मध्ये ४ परदेशी खेळाडूंनाच संधी मिळत असल्याने या दोघांना कदाचित एकत्र खेळता येणार नाही. त्यामुळे चेन्नई एखाद्या भारतीय खेळाडूचा शोध घेऊ शकतात, जेणेकरुन हरभजन सिंगची जागा भरुन निघेल.
१. जलज सक्सेना
स्थानिक क्रिकेटपटू जलज सक्सेनाने ६३३४ धावांसह ३४७ प्रथम श्रेणी बळी घेतले आहेत. तसेच त्याने आत्तापर्यंत ५४ ट्वेंटी२० सामने खेळले असून ६३३ धावा आणि ४९ बळी घेतले आहेत. सध्या तो घरगुती क्रिकेटमध्ये केरळ संघाचा भाग आहे आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सक्सेनाला अद्याप आयपीएल किंवा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो मागच्यावेळी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. परंचु त्याला लिलावाआधी मुक्त करण्यात आले होते. तो हरभजनची जागी चेन्नईसाठी खेळू शकतो.
२. सुदेश मिथुन
२०१८ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने सुदेश मिथुन याच्यावर 20 लाखाची बोली लावली होती. आयपीएल २०२० च्या लिलावाआधी मिथुनला राजस्थानने सोडले होते आणि आता सीएसके कदाचित हरभजनच्या अनुपस्थितीत त्याला संधी देण्याचा विचार करेल.
टी -20 मधील त्याच्या आकडेवारीबद्दल बोलले तर, मिथुनने १४ सामन्यांत ६.६२ च्या इकॉनॉमिसह १४ बळी घेतले आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये लेग ब्रेक आणि गुगली यामुळे २५ वर्षीय मिथुन नक्कीच आपली ओळख निर्माण करू शकेल.
३. शम्स मुलानी
२३ वर्षीय शम्स मुलानीलाही बराच घरगुती क्रिकेटचा अनुभव आहे. डावखुरा फलंदाज मुलानी जो प्रामुख्याने फलंदाजी करतो, तो गोलंदाजी विभागातही कामगिरी बजावू शकतो. रवींद्र जडेजाप्रमाणेच मुलानी चेन्नईच्या छावणीत एक महत्त्वाचा दल म्हणून उदयास येऊ शकतो.
१० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये मुलानीने २८ बळी घेऊन ५५६ धावा केल्या. मुलानी अजूनही २३ वर्षांचा आणि सीएसकेने भविष्याचा विचाक करुन त्याला संघात स्थान देऊ शकतात. रायगडमध्ये जन्मलेल्या या अष्टपैलू खेळाडूने २२ टी -२० सामन्यात ७९ धावा केल्या आहेत आणि २३.२५ च्या सरासरीने २० बळी घेतले आहेत.
४. एम अभिनव
एम अभिनव हा आणखी एक आश्वासक फिरकी गोलंदाज आहे. त्याने तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळताना प्रभावित केले होते. टीएनपीएलच्या १६ सामन्यात त्याने ६.२ च्या प्रभावी इकॉनोमीने १७ बळी घेतले आहेत. पीयूष चावलासारख्या दिग्गजांसोबत खेळून अभिनवही अनुभव मिळवू शकतो. त्यामुळे त्याचाही चेन्नईचा संघ एकदा हरभजनचा बदली खेळाडू म्हणून विचार करु शकतात.
५. एस माणिकंदन
अभिनव प्रमाणेच मनिकंदननेही शेवटच्या तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये लक्ष वेधले. सीएसकेला हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूऐवजी स्थानिक कौशल्याचा प्रयोग करायचा असेल तर मनिकंदन नक्कीच एक चांगला पर्याय ठरु शकतो. त्याने १० टीएनपीएल सामन्यांमध्ये मनिकंदनने १६ गडी बाद केले होते.
टीएनपीएल सामन्यात त्याने पहिल्याच षटकात दोन चेंडूंत दोन गडी बाद करत प्रभावित केले. सीएसकेने एखाद्या उत्तुंग युवा प्रतिभेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यास तो चेन्नई सुपर किंग्जच्या रडारवर येईल.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलचे सितारे : धोनीचा आदर्श घेतलेला झारखंडचा २२ वर्षीय विराट सिंग
आयपीएल २०२० मधून वेगवेगळ्या कारणाने माघार घेणाऱ्या खेळाडू्ंची यादी संपुर्ण यादी
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
महत्त्वाच्या बातम्या –
६ षटकार ठोकत सिमन्सने केल्या ९६ धावा, नाईट रायडर्सने मिळविला सलग ८ वा विजय
धोनीला क्रिकेटचे धडे देणाऱ्या या मार्गदर्शकाच्या स्थितीत सुधारणा, ५ दिवसांपासून होते व्हेंटिलेटरवर
आयपीएलच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा कायम; ब्रिजेश पटेल यांनी सांगितली नवी तारीख