आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला अवघ्या काही दिवसात सुरुवात होत आहे. काही आयपीएल संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत आणि काही संघ पुढील काही दिवसात पोहोचणार आहेत. यूएईमध्ये विलगीकरणाचा कालावधी पार केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघांनी सरावाला सुरुवात केली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ १३ ऑगस्टला अबुधाबीमध्ये पोहोचला होता. तेथे त्यांंनी ६ दिवस विलगीकरणाचा कालावधी पार केला. त्यानंतर संघाने सरावाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या संघाने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली.
मुंबई इंडियन्सने संघ सराव करतानाचा व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे, “पहिला दिवस ५५ सेकंदात पाहा ! तुमचे नोटिफिकेशन चालू ठेवा आणि आमच्या सोबत जोडलेले रहा.”
या व्हिडिओत ईशान किशन, धवल कुलकर्णी, जयंत यादव, आदित्य तारे यांच्यासोबतच बाकीचे खेळाडू सराव करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत सपोर्ट स्टाफमधील जहीर खान आणि राॅबिन सिंगही दिसत आहेत. खेळाडूंनी पहिल्यांदा जाॅगिंग केली आणि फुटबाॅलही खेळला. त्यानंतर खेळाडूंनी नेटमध्ये सरावही केला.
मुंबईच्या संघाचे मुख्य खेळाडू अजून संघासोबत सामील झालेले नाहीत. यामध्ये रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर हे खेळाडू संघासोबत सामील होतील.
First day at office in 5️⃣5️⃣ seconds!
Turn on your notifications and stay tuned 😉#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #KhelTakaTak @MXTakaTak MI TV pic.twitter.com/2tIKYsdVJI
— Mumbai Indians (@mipaltan) August 21, 2021
याआधी मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर केला हेता. या व्हिडिओत संघाचे खेळाडू अबुधाबीत स्विमिंग पूलमध्ये व्हॉलीबाॅल खेळत होते. व्हिडिओत दिसत होते की खेळाडू पुलमध्ये खूप मजा करत होते.
https://twitter.com/mipaltan/status/1428907205508612096
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ भिडणार आहेत. मुंबईचा संघ सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रक्षाबंधन विशेष: १० भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या लाडक्या बहिणी
अफगाणिस्तानमधील अमेरिकन जवानामुळे स्टीव्ह स्मिथ होतोय ट्रेंड, वाचा नक्की काय आहे प्रकरण