शनिवार रोजी (२६ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमने सामने असतील. या सामन्यासह ६५ दिवस चालणाऱ्या आयपीएल १५ ची सुरुवात होईल. यंदा २ संघ नव्याने सहभागी झाल्यामुळे एकूण ७४ सामने खेळवले जातील. यातील प्रत्येक सामन्यातील मैदानांवरील हालचाली सांगण्याची जबाबदारी १० दिग्गजांवर असेल. यामध्ये सुरेश रैना, रवि शास्त्री अशा नावांचा समावेश आहे.
मिस्टर आयपीएल रैना (Suresh Raina) आणि धवल कुलकर्णी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये समालोचन करताना दिसतील. तर रवी शास्त्री (Ravi Shastri) दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा माईक हाती घेतील. तर राज्यसभा खासदार बनण्यापूर्वी हरभजन सिंग पहिल्यांदाच आयपीएलमध्ये समालोचन करेल. तसेच आकाश चोप्रा, जतिन सप्रूसारखे लोकप्रिय समालोचकही या लीगचे समालोचन (IPL 2022 Commentators List) करतील.
समालोचकांच्या पॅनलमध्ये सहभागी १० दिग्गज
आयपीएल २०२२ साठी समालोचकांच्या पॅनेलमध्ये रवी शास्त्री, सुरेश रैना, आकाश चोप्रा, मोहम्मद कैफ, जतिन सप्रू, निखिल चोप्रा, इरफान खान, पियुष चावला, हरभजन सिंग आणि धवल कुलकर्णी यांचा समावेश आहे. हे १० दिग्गज आयपीएल दर्शकांना सामन्याचे प्रत्येक अपडेट सांगतील. यापैकी शास्त्री हे सर्वात अनुभवी समालोचक आहेत, तर धवल हा सर्वात युवा समालोचक असेल.
शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होते, त्यामुळे त्यांना बऱ्याच काळासाठी समालोचन क्षेत्रापासून दूर राहावे लागले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करतील.
https://www.instagram.com/p/CbjdlrkKQZF/?utm_source=ig_web_copy_link
आकाश चोप्रा आणि इरफान पठाणसारखे खेळाडूही दिसतील
भारतीय समालोचकांच्या रूपात आकाश चोप्रा आणि इरफान पठाणसारख्या खेळाडूंनी त्यांची विशेष ओळख बनवली आहे. अधिकतर सामन्यांमध्ये हे खेळाडू समालोचन करताना दिसले आहेत. दर्शकांनाही त्यांचे समालोचन फार आवडते. या २ नावांव्यतिरिक्त कैफ, जतिन आणि हरभजन हेदेखील दर्शकांचे आवडते समालोचक ठरतील.
महत्त्वाच्या बातम्या-
स्मिथचा जबरदस्त कॅच, पण डीआरएसची ‘गुगली’ अन् बाद होऊनही नाबाद राहिला आझम- Video
Video: मुंबई इंडियन्सचे सरप्राईस पाहून आठवणीत रमला सचिन तेंडुलकर; विनोद कांबळीचीही खास प्रतिक्रिया
उद्घाटन सोहळ्याची भरून निघणार कसर! पहिल्या आयपीएल मॅचपूर्वी टोकियो ऑलिंपिक विजेत्यांचा सन्मान