चालू आयपीएल हंगामातील ३८व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला ११ धावांनी मात दिली. सीएसकेला पराभूत करून पंजाबने हंगामातील चौथा विजय मिळवला. या विजयात त्यांचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे योगदान महत्वाचे ठरले. शेवटच्या षटकात जेव्हा सीएसकेला धावांची आवश्यकता होती, तेव्हा रबाडाने फायदेशीर गोलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. विजयानंतर त्याने एमएस धोनीसमोर गोलंदाजी करण्याचा अनुभव व्यक्त केला.
रबाडाच्या मते पॉवरप्लेमध्ये त्यांचा संघ अधिक धावा करू शकला नाही, पण नंतर शिखर धवन आणि भानुका राजपक्षने संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले. फलंदाजांविषयी बोलताना कागिसो रबाडा (Kagiso Rabada) म्हणाला की, “लिविंगस्टोनने शेवटी ज्या पद्धतीने काही चांगले शॉट्स खेळले, त्यामुळे आम्ही विजय मिळवण्याइतपत स्कोर करू शकलो. आमच्या गोलंदाजी आक्रमणातील प्रत्येक सदस्याने सर्वोत्तम प्रदर्शन केले. अर्शदीप या स्पर्धेत शेवटच्या षटकांमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याचे आकडे या गोष्टीची ग्वाही देतात. त्याच्याकडे खूप गुणवत्ता आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
धोनीविरोधात गोलंदाजी करताना येतो दबाव
रबाडाच्या मते संघातील सर्व खेळाडूंना त्यांचा रोल माहिती आहे आणि सर्वजण त्यानुसार काम करत असतात. तो म्हणाला, “राहुल (चाहर) आमच्यासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. संदीपकडे अनुभव आहे आणि त्याने पॉवरप्लेमध्ये आमच्यासाठी महत्वाची विकेट घेतली. शेवटच्या षटकात ऋषी धवनने चांगली गोलंदाजी केली. असे असले, तरीही तुम्ही एमएस धोनीसमोर जेव्हा गोलंदाजी करता, तेव्हा तुमच्यावर दबाव असतो. प्रेक्षकांमध्ये कुठेही लाल रंगाचा शर्ट नव्हता आणि सर्वत्र पिवळ्या शर्टमधील चाहते धोनीचे नाव घेत होते. ऋषीने त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि यासाठी त्याला श्रेय मिळाले पाहिजे.”
दरम्यान उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक गमावल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी केली. पंजाबने ४ विकेट्सच्या नुकसानावर १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेला हे लक्ष्य गाठता आले नाही. सीएसकेने २० षटकात ६ विकेट्स गमावल्या आणि १७६ धावा केल्या. रबाडाने टाकलेल्या चार षटकात २३ धावा खर्च केल्या आणि २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धीराने नाही, तर जोमाणे करावे लागेल काम; चेन्नईच्या फलंदाजांकडून चाहत्यांना आक्रमक खेळीची अपेक्षा
हार पत्करायला तयार नाही गुजरात टायटन्स; शमीने उचलला सर्वाधिक विकेट घेण्याचा विडा
चेन्नईच्या पराभवाला ‘ही’ ३ कारणे जबाबदार; कर्णधारानेच केली घोडचूक