---Advertisement---

नशीबच फुटकं! खणखणीत अर्धशतक झळकावूनही विराट का होतोय ट्रोल? जाणून घ्या कारण

Virat-Kohli
---Advertisement---

शनिवारी (३० एप्रिल) गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने चांगला खेळ दाखवला. मागच्या १४ आयपीएल सामन्यात विराट पहिल्यांदाच अर्धशतकाचा टप्पा पार करू शकला. परंतु विराटच्या या योगदानानंतर देखील आरसीबीला पराभव पत्करण्याची वेळ आहे. याच कारणास्तव नेटकरी विराटला पुन्हा ट्रोल करू लागले आहेत.

त्याचे झाले असे की, विराटने या सामन्यात अर्धशतक केले खरे, पण यासाठी त्याला ४५ चेंडू खेळावे लागले. सामन्यात त्याने एकूण ५३ चेंडू खेळले आणि ५८ धावांचे योगदान दिले. विराट कोहली (Virat Kohli) एकटाच फलंदाज नव्हता, ज्याने अर्धशतक केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारने अवघ्या ३२ चेंडूत ५२ धावा ठोकल्या आणि त्याच्यासमोर विराटचे प्रदर्शन नक्कीच फिके पडले. नेटकरी विराटला त्याच्या संथ गतीच्या खेळीसाठी सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत आणि पराभवास कारणीभूत देखील ठरवत आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना विराट आणि पाटीदार या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर १७० धावा उभ्या केल्या. यासाठी आरसीने ६ विकेट्सही गमावल्या, परंतु गुजरातने हा सामना अखेर जिंकलाच. १७१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर गुजरातने १९.३ षटकात आणि ६ विकेट्स राखून विजय मिळवला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आरसीबी आणि राजस्थान या दोन्ही संघांचे कर्णधार अपयशी ठरले. फाफ डू प्लेसिस शून्यावर बाद झाला, तर हार्दिक पांड्याने अवघ्या तीन धावा करून विकेट गमावली. गुजरात टायटन्सचा फिनिशर राहुल तेवतिया आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आला आहे. आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात त्याने संघाला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला.

राहुल तेवतिया आणि डेविड मिलरने ४० चेंडूत ७९ धावांची भागीदारी पार पाडली आणि गुजरातला हंगालामातील आठवा विजय मिळवून दिला. तेवतियाने वैयक्तिक ४३ आणि मिलरने वैयक्तिक ३९ धावा केल्या आणि शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘गावसकर, कपिल देव यांच्यानंतर आता पुढचा लिजेंड तोच’, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी गायले राहुलचे गुणगान

ब्रेकिंग! फुटबॉल विश्वातील ‘सुपर एजंट’ने घेतला जगाचा निरोप, प्रसिद्ध खेळाडूंचे केले होते प्रतिनिधित्व

मुंबईकडे गमावण्यासाठी काहीच नाही! आतातरी अर्जुन तेंडुलकरला मिळणार का पदार्पणाची संधी?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---