इंडियन प्रीमीयर लीग स्पर्धेच्या (आयपीएल) मैदानात शनिवारी (२ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने सुरुवातीला फलंदाजी आणि नंतर क्षेत्ररक्षणात जबरदस्त प्रदर्शन केले. मुंबई इंडियन्ससाठी खेळणाऱ्या डॅनियल सॅम्सला बटलरने जबरदस्त झेल घेऊन बाद केले.
जोस बटलर (Jos Buttler) याने मुंबईच्या फलंदाजीवेळी १६ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हा अप्रतिम झेल पकडला. मुंबई इंडियन्सचा टीम डेविड बाद झाल्यानंतर डॅनियल सॅम्स फलंदाजीसाठी आला. खेळपट्टीवर येताच सॅम्सने पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू हवेत उंच गेला आणि बटलरने त्याला हवेत झेपावून चेंडू पकडून झेलबाद केले.
यावेळी मिड ऑनवर उभा असलेला बटलर उलट्या दिशेने धावला आणि हा झेल घेतला. त्याने चेंडूचा योग्य अंदाज घेतला आणि डाइव मारत झेल पकडला. बटलरचा हा झेल आयपीएल २०२२ मधील सर्वोत्कृष्ट झेल देखील बनू शकतो. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
What a catch Mr Buttler .@josbuttler #MIvsRR #Josebuttler #IPL pic.twitter.com/hvUxIadCmK
— Muhammad Shadab Khan (@_shadabkhan24) April 2, 2022
सामन्याचा विचार केला, तर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईचा संघ मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा करून शकला. राजस्थानसाठी सलामीवीर बटलरने सर्वाधिक १०० धावा केल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. बटलरचे आयपीएलमधील हे दुसरे शतक ठरले. या विजयानंतर राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल फक्त १ धाव करून तंबूत परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कल ७ धावा करून तंबूत परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला संजू सॅमसनने जोस बटलची साथ दिली वैयक्तिक ३० धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकांमध्ये शिमरन हेटमायरने १४ चेंडूत ३५ धावां टोकल्या आणि संघाला मोठी धावसंख्या मिळवून दिली.
मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्सने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईसाठी सलामीवीर ईशान किशनने ५४ आणि मधल्या फळीतील तिसक वर्माने सर्वाधिक ६१ धावा केल्या. कर्णधार रोहित अवघ्या १० धावा करून बाद झाला. कायरन पोलार्डने २२ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त मुंबईचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
IPL2022| चेन्नई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
जेव्हा २५ वर्षांपूर्वी संघातील सर्व खेळाडूंना मिळाला होता सामनावीराचा पुरस्कार
Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती