आयपीएल २०२२ मध्ये हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स जबदरस्त प्रदर्शन करत आहे. या फ्रँचायझीचा हा पहिला आयपीएल हंगाम आहे आणि त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. संघाला मिळालेल्या या यशामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या आणि उपकर्णधार राशिद खान यांचे योगदान महत्वाचे मानले जात आहे. हार्दिक आणि राशिद एकमताने संघासाठी सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. फ्रँचायझीने त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हार्दिकचा मुलगा अगस्त्य देखील दिसत आहे.
भारतीय संघाचा २८ वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) जेव्हापासून गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला आहे, तेव्हापासून तो फॉर्ममध्ये परतल्याचेही दिसत आहे. त्याच्या नेतृत्वात आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने त्यांच्या सुरुवातीच्या १० सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत त्यांचा संघ १६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत कर्णधार हार्दिक पंड्या आणि त्याच्या कडेवर त्याचा मुलगा अगस्त्य (Agastya) दिसत आहेत. उपकर्णधार राशिद खान (Rashid Khan) अगस्त्य सोबत मस्ती करताना दिसत आहे. राशिद अगस्त्यला फ्लाइंग किस देतो, तर त्याच्या प्रत्युत्तरात अगस्त्यकडून देखील त्याला फ्लाइंग किस मिळाला आहे.
गुजरात टायटन्सने हा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “फक्त तीन शब्द…आतापर्यंतचा सर्वात क्यूट व्हिडिओ.” फ्रँचायझीने शेअर केलेल्या या व्हिडिओला हार्दिक पांड्या आणि राशिद खानच्या चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. एका चाहत्याने व्हिडिओवर कमेंट करून लिहिले की, “राशिद खूप नम्र व्यक्ती आहे.” अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.
Just three words… Cutest Video Ever😍#SeasonOfFirsts #AavaDe @hardikpandya7 @rashidkhan_19 pic.twitter.com/j68p8ebml3
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 4, 2022
दरम्यान, हार्दिक पंड्या खराब फॉर्ममध्ये असताना देखील भारतीय संघाने मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात संधी दिली होती. परंतु, तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. त्याच्या खराब फॉर्मचा परिणाम संघावर देखील पडला. विश्वचषक स्पर्धेत भारतासारखा बलाढ्य संघ प्लेऑफमध्ये देखील पोहोचू शकला नाही. असे असले तरी गुजरात टायटन्सचा कर्णधार झाल्यानंतर त्याच्या प्रदर्शनात चांगलीच सुधारणा झाली आहे. याच कारणास्तव भारतीय संघात देखील त्याचे पुनरागमन होऊ शकते. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हार्दिकचे आयपीएलमधील प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘जडेजाबद्दल वाईट वाटतंय, पण चेन्नईचे नेतृत्व सोडल्याबद्दल त्याचे अभिनंदन’, वाचा असं का म्हणाला वॉटसन
मानलं भावा! मॅक्सवेलने जडेजा आणि मोईनची गोलंदाजी पाहून चेन्नईच्याच गोलंदाजांच्या उडवल्या दांड्या