आयपीएलच्या चालू हंगामातील ३६वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. आरसीबीचा संपूर्ण संघ अवघ्या ६८ धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने हे लक्ष्य सहज गाठले. आरसीबीसाठी हे त्यांचे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे सर्वात खराब प्रदर्शन ठरले.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शनिवारी (२३ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने चाहत्यांची चांगलीच निराशा केली. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकसारखे दिग्गज फलंदाज संघात असताना देखील आरसीबी स्वस्तात गुंडाळली गेली. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने केलेली ही दुसरी सर्वात लहान धावसंख्या ठरली. या सामन्यात आरसीबी संघ १६.१ षटकात आणि ६८ धावा करून सर्वबाद झाला.
An extremely hard day at the office.
Time to learn from this and move forward. #PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvSRH pic.twitter.com/T7foQTLEGg
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 23, 2022
आरसीबीने आयपीएलमध्ये केलेल्या सर्वात खराब प्रदर्शनाचा विचार केला, तर ते आयपीएल २०१७मध्ये पाहायला मिळाले होते. २३ एप्रिल, २०१७ रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने अवघ्या ४९ धावा करून सर्वच्या सर्व १० विकेट्स गमावल्या होत्या.
दरम्यान, हैदराबाद आणि आरसीबी (SRH vs RCB) यांच्यातील शनिवारी खेळल्या गेलेल्या या सामन्याचा विचार केला, तर त्यांनी हैदराबादच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केले. मार्को जेन्सन आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स नावावर केल्या. जगदीश सुचिथने दोन, तर भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिकच्या वाट्याला प्रत्येकी एक-एक विकेट आली.
आरसीबीच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला. विराटव्यतिरिक्त सलामीवीर अनुज रावत आणि अनुभवी दिनेश कार्तिक देखील शून्यावर बाद झाले. संघातील ६ खेळाडू दोन आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत, तर राहिलेल्या दोन फलंदाजांनी २० धावांच्या आतमध्ये विकेट गमावली. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघाने अवघ्या ८ षटकात आणि एका विकेटच्या नुकसानावर विजय मिळवला. या विजायनंतर हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी खेळला जाणार आयपीएल २०२२चा अंतिम सामना; दर्शकांना १०० टक्के क्षमतेने एन्ट्री
KKR vs GT। फर्ग्युसनच्या अफलातून कॅचने फिरवला सामना; रसेलच्या विकेटमुळे चाहत्यांच्या अपेक्षा धुळीस