आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव देखील आयोजित केला जाणार आहे. मेगा लिलावाला अजून जवळपास एक महिना वेळ आहे. मात्र, आतापासूनच त्याची लगबग पाहायला मिळू लागलीये. अश्या बातम्या समोर येत आहेत की, लखनऊ आणि अहमदाबाद या नवीन फ्रेंचायझींनी त्यांचे ३-३ ड्राफ्ट खेळाडू निवडले आहेत. तसेच, कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या संघाचा नवीन कर्णधार देखील निवडला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सने मागच्या वर्षीचा हंगाम संपल्यानंतर त्याचा कर्णधार ओएन मॉर्गनला रिलिज केले होते. अशात पुढच्या हंगात त्यांना नवीन कर्णधाराची आवश्यकता आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कोलकाता नाइट रायडर्स आयपीएलच्या आगामी हंगामासाठी एखाद्या युवा खेळाडूला कर्णधार बनवू इच्छिते. दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर केकेआरच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. श्रेयस अय्यरकडे असलेली गुणवत्ता आणि नेतृत्वाचा अनुभव पाहता केकेआर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करेल, अशी शक्यता आहे.
यासह दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळलेले अजून दोन खेळाडू पुढच्या हंगामात लखनऊ फ्रेंचायझीसाठी खेळताना दिसू शकतात. माहितीनुसार, मार्कस स्टॉयनिस आणि कगिसो रबाडा पुढच्या हंगामात लखनऊसाठी खेळताना दिसू शकतात. तसेच भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलचे नाव लखनऊच्या कर्णधाराच्या रूपात समोर येत आहे.
अहमदाबाद फ्रेंचायझीने हार्दिक पंड्याला त्यांच्या संघाचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स हार्दिकला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले नव्हते. माध्यमांतील वृत्तानुसार, आता हा अष्टपैलू खेळाडू अहमदाबाद संघाचा कर्णधार होईल. त्याव्यतिरिक्त राशिद खान आणि इशान किशन देखील अहमदाबाद संघात सामील होतील.
दरम्यान, आयपीएल २०२२ पूर्वी मेगा लिलाव बेंगलोरमध्ये होणार आहे. मेगा लिलावाची तारीख अद्याप जाहीर गेली गेली नाही. मात्र, अशी माहिती मिळत आहे की, मेगा लिलाव ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
U19 विश्वचषक चार दिवसांवर येऊन ठेपलाय आणि अफगाणिस्तान संघ अजून पोहोचलाच नाही; गंभीर आहे कारण
तमिल थलाइवाजाच्या यशाची मालिका सुरूच! हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात
है तय्यार हम! अंडर-१९ विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात यंग इंडियाची यजमान विंडीजवर दणदणीत मात
व्हिडिओ पाहा –






