आयपीएलचा १५ वा हंगाम २६ मार्चला सुरू होत आहे, त्यापूर्वी सर्व संघ आयपीएलची तयारी करत आहेत. यावेळी पण सर्वांच्या नजरा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याकडे असणार आहेत. यावर्षी तर १० संघ आयपीएल खेळताना दिसणार आहेत, त्यामुळे या संघांमध्ये आयपीएलच्या विजेतेपदासाठी चढाओढ पाहताना दिसणार आहे. या लेखात आपण अशा संघांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आहे. केकेआरने आयपीएलमध्ये २०९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने २८४० चौकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये एका सामन्यात केकेआरने २४ चौकार लगावले होते. कोलकता संघाने आयपीएलमध्ये दोनदा ट्राॅफी जिंकली आहे. मागील वर्षी सुद्धा केकेआर संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. केकेआरचा अंतिम सामना सीएसके सोबत पार पडला, परंतु केकेआरला अपयश आले. यावर्षी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला बनवण्यात आले आहे. केकेआर हा संघ यावर्षी आयपीएल ट्राॅफी जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)
सर्वाधिक चौकार लगावण्याच्या बाबतीत दिल्ली कॅपिटल्स संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली संघाने २१० सामन्यांमध्ये २८६० चौकार लगावले आहेत. दिल्ली संघाने २०१७ मध्ये गुजरात संघाविरुद्ध सर्वाधिक ३१ चौकार लगावले आहेत, हे चौकार दिल्लीचे एका सामन्यातील सर्वाधिक चौकार आहेत. मागील काही हंगामात दिल्ली संघ चांगली खेळी करताना दिसत आहे आणि यावर्षी सुद्धा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघ विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
मुंबई इंडियन्स( Mumbai Indians)
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने आयपीएल इतिहासात ५ वेळा विजेतेपद जिंकले आहे. मुंबईने २१७ सामन्यांमध्ये २९८० चौकार लगावले आहेत. मुंबईने सर्वाधिक ३० चौकार लगावले होते, जे मुंबईचे एका सामन्यातील सर्वाधिक चौकार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ यावर्षी आयपीएल विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ११ वर्षांनंतर केकेआरविरुद्ध आयपीएल उद्घाटनाचा सामना खेळणार सीएसके, पाहा उभयंतांचे आकडे
नशिबाची साथही इंग्लंडलाच! स्टंप्सला बॉल लागूनही नाही पडल्या बेल्स, इथेच लिहीला गेला भारताचा पराभव
मोठी बातमी! शारापोव्हा आणि शुमाकर यांच्यावर गुडगाव पोलिसांकडून फसवणूकीचा गुन्हा दाखल, प्रकरण गंभीर