आयपीएल २०२२ च्या २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत झाली. हा सामना हैदराबादने ८ विकेट्स राखून नावावर केला. सामन्यादरम्यान टाकलेला एक बाउंसर चेंडू थेट हार्दिक पंड्याच्या हेल्मेटवर लागला. सुदैवाने हार्दिकला कोणती गंभीर दुखापत झाली नाही, पण या प्रसंगी त्याची पत्नी नताशाची चिंता चांगलीच वाढली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सनरायझरर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यातील हा सामना पाहण्यासाठी हार्दिक पांड्याची पत्नी मैदानात उपस्थित होती. युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) त्याच्या गतीसाठी ओळखला जातो आणि या सामन्यातील पहिल्याच चेंडूत त्याने स्वतःची रनणीती सिद्ध केली. उमरान मलिकने टाकलेला पहिलाच चेंडू एक वेगवान बाउंसर होता, जो थेट स्ट्राईकवर असलेल्या हार्दिक पांड्याच्या हेल्मेटला जाऊन लागला. उमरानच्या या चेंडूचा सामना केल्यानंतर स्वतः हार्दिक पांड्या (Hardik Pandya) देखील हैराण होता. उमरानचा हा बाऊंसर त्याच्यासाठी अनपेक्षित होता. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविच (Natasha Stankovic) देखील या खतरनाक बाउंसरनंतर चिंतेत पडल्याची दिसली.
या चेंडूनंतर तत्काळ हार्दिकने सर्वकाही ठीक असल्याची पुष्टी केली आणि पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार झाला. हार्दिकला चेंडू लागल्यानंतर गुजरात टायटन्सचे फिजिओ मैदानात धावत सुटले होते, पण हार्दिकने त्यांना माघारी पाठवल्याचेही दिसले. असे असले तरी, हार्दिकने पुढच्या दोन चेंडूंवर लागोपाठ दोन चौकार मारले आणि उमरान मलिकला चोख प्रत्युत्तर दिले. हा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Raj93465898/status/1513527432678371332?s=20&t=jruHDVR85xf6ONAGuHmsog
उमारन मलिकच्या गोलंदाजीत वेग जरी असला, तरी गुजरातविरुद्धच्या या सामन्यात तो संघासाठी महागात पडल्याचे दिसले. त्याने सामन्यात १४५ किमी ताशी वेगापेक्षा अधिक गतीने गोलंदाजी केली, पण तो अपेक्षित यश मिळवू शकला नाही. त्याने टाकलेल्या ४ षटकात ३९ धावा खर्च केल्या आणि एक विकेट घेतली. यादरम्यान त्याची इकोनॉमी ९.७५ होती. दुसरीकडे हार्दिक पांड्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हार्दिकने ४२ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या.
सामन्याचा विचार केला, तर हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने ७ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने सर्वात मोठी ५७ धावांची खेळी आणि संघाला ५ चेंडूत शिल्लक असताना विजय मिळवून दिला. विलियम्सन सामनावीर देखील ठरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सलग दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला मोठा धक्का, ‘हा’ स्टार क्रिकेटर २ आठवड्यांसाठी संघातून बाहेर
‘ती’ अविस्मरणीय खेळी, जेव्हा ब्रायन लाराने विरोधकांची पिसे काढत चोपल्या होत्या बिनबाद ४०० धावा
उमरानच्या १४०kphचा चेंडू मारण्याच्या प्रसंगावर हार्दिक म्हणाला, ‘मी अशा गोलंदाजांना असंच जाऊ देणार…’