रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ घोषित केला. पाच सामन्यांची ही टी-२० मालिका खेळण्यासाठी पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या गतीने सर्वांना हैराण केलेल्या उमरान मलिकला या मालिकेसाठी भारतीय संघात निवडले आहे. उमरानची निवड झाल्यानंतर त्याच्या मुळ गावी चांगलाच जल्लोष केला गेला. यानंतर आता त्याच्या वडिलांनी खास प्रतिक्रिया दिली आहे.
उमरान मलिक मुळचा जम्मू कश्मीरचा आहे. त्याची भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याठिकाणी मोठा जल्लोष केला गेला. यावर्षी आयपीएलमध्ये १४ सामन्यांमध्ये २२ विकेट्स त्याने घेतल्या आहेत. संपूर्ण हंगामात त्याने ४९.१ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ९.०३ च्या इकोनॉमी रेटने ४४४ धावा खर्च केल्या आहेत. काही सामन्यांमध्ये तो सनरायझर्स हैदराबादला महागात जरी पडला असला, तरी त्याच्या चेंडूच्या गतीमुळे त्याला संघात संधी मिळाली आहे. उमरान सातत्याने १५० किमी पेक्षा अधिक ताशी गतीने गोलंदाजी करू शकतो.
भारतीय संघात उमरान मलिक (Umran Malik) निवडला गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी खास प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “एवढे प्रेम देण्यासाठी मी देशाचा आभारी आहे. हे सर्व मुलाच्या मेहनतीमुळे झाले आहे. तो देशाचे नाव करेल.” राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर उमरानचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने या आनंदात जल्लोष केला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले आहेत. कुटुंबीयांनी आणि मित्रांनी मिठाई देखील वाटली आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-२० मालिकेसाठी जो भारतीय संघ निवडला गेला आहे, त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांची नावे नाहीत. या तिघांनी टी-२० मालिकेदरम्यान विश्रांती दिली गेली आहे. उमरानप्रमाणेच अर्शदीप सिंगला देखील पहिल्यांदाच भारतीय संघात निवडले गेले आहे. आता या दोघांना अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते की नाही? हे मात्र पाहावे लागणार आहे.
उभय संघातील या मालिकेसाठी भारताचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांचे देखील पुनरागमन झाले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाची कमान सांभाळेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सुरेश रैना म्हणतोय आरसीबीने जिंकावे आयपीएल; कारण ऐकून व्हाल चकीत
गुजरातला आयपीएल विजेतेपद जिंकायचे असेल, तर ‘या’ ५ खेळाडूंना दाखवावी लागेल कमाल
उमरान मलिकने टीम इंडियात जागा मिळताच मानले इरफान पठाणचे आभार, वाचा काय आहे कारण