बीसीसीआयने आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावासाठी (mega auction) मंगळवारी (१ फेब्रुवारी) ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत लिलावात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्या खेळाडूंची नावे आहेत. यामध्ये २२८ कॅप्ड आणि ३५५ अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. मेगा लिलावात अनेक दिग्गज उतरणार आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, पण एक मंत्री मेगा लिलावात सहभागी होणार आहे म्हटल्यावर अनेकांना त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की, आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात एक मंत्री सहभागी होणार आहे.
पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwari) याने मेगा लिलावासाठी स्वतःचे नाव दिले आहे. तिवारीने त्याची बेस प्राईस ५० लाख रुपये ठेवली आहे. तिवारी त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला जातो. तिवारीकडे आयपीएल सामन्यांचा चांगला अनुभव आहे. त्याने आतापर्यंत ९८ सामन्यांमध्ये १६९५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांचे प्रतिनिधित्व केले आहे.
हेही वाचा- आयपीएल लिलावासाठी क्रिकेटर्स तयार, पण कोणत्या फ्रँचायझीकडे किती जागा बाकी? किती आहे त्यांचे बजेट?
मनोज तिवारी यापूर्वी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही खेळला आहे. त्याने १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. मैदानात असताना मोठे शॉट खेळण्यासाठी ओळखला जाणाऱ्या तिवारीने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याने १२५ सामन्यांमध्ये ८००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या एका तिहेरी शतकाचाही समावेश आहे. अशात आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्यावर किता रुपयांची बोली लागते? ही गोष्ट पाहण्यासारखी असेल.
यावर्षीचा आयपीएल हंगाम खास ठरणार आहे. यावर्षी लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रेंचायझी आयपीएलमध्ये सामील होणार आहेत. या दोन नवीन फ्रेंचायझींच्या पार्श्वभूमीवर मेगा लिलावाचे आयोजन केले गेले आहे. प्रत्येक संघाला मागच्या हंगामातील प्रत्येकी चार खेळाडूंना संघात रिटेन करण्याची संधी दिली गेली होती आणि इतर सर्व खेळाडूंना मेगा लिलावात उतरावे लागले आहे. अशात मेगा लिलाव खरोखर पाहण्यासारखा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
मेगा लिलावात ४८ खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये, जाणून घ्या पडिक्कलपासून ते रायुडूपर्यंतची नावे
विराटने गिफ्ट केला होता फ्लॅट, तर धोनीने बोलावले होते मुंबईला, कोण आहे ही पूजा बिश्नोई? घ्या जाणून
पहिल्याच हंगामात आरसीबीने पैशांचा पाऊस पाडल्याने विराट झालेला चकित, २००८च्या आठवणीत झाला भावुक