इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 53वा सामना कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स संघात ईडन गार्डन्सवर सोमवारी (दि. 8 मे) 7.30 वाजता खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी कोलकाता विरुद्ध पंजाब संघात 7 वाजता नाणेफेक झाली. पंजाब संघाचा कर्णधार शिखर धवन याने ही नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघ गुणतालिकेत झेप घेण्याचा प्रयत्न करतील.
पंजाब किंग्स संघात एक बदल झाला आहे. मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short) हा संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) याची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे कोलकाता संघ मागील संघासोबतच मैदानात उतरणार आहे.
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL have elected to bat against @KKRiders at Eden Gardens.
Follow the match ▶️ https://t.co/OaRtNpAfXD#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/BBRAIQXvrL
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2023
हंगामातील कामगिरी
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders ) संघाने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यातील फक्त 4 सामन्यात त्यांच्या पदरी विजय पडला आहे, तर उर्वरित 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्स (Punjab Kings) संघानेही 10 सामने खेळले आहेत. मात्र, त्यांनी 5 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 5 सामन्यात पराभव पत्करला आहे. कोलकाता संघ 8 गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. तसेच, पंजाब संघ 10 गुणांसह सातव्या स्थानी आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेतील त्यांच्या स्थानांमध्ये बदल होऊ शकतो. (IPL 2023 53rd match Kolkata Knight Riders vs Punjab Kings Toss read here)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब किंग्स
प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग
कोलकाता नाईट रायडर्स
रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक-एक धावेसाठी तरसणाऱ्या रोहितसाठी शास्त्रींचा खास संदेश, म्हणाले, ‘अजून हंगाम संपला नाही…’
बिग ब्रेकिंग! WTC फायनलसाठी टीम इंडियातून केएल राहुलचा पत्ता कट, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी