इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा बहुप्रतिक्षित अंतिम सामना जवळ येत चालला आहे. अंतिम सामना खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ आधीच निश्चित झाला आहे, परंतु अद्याप दुसऱ्या संघाची निश्चिती होणे बाकी आहे. त्यासाठी गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी (दि. 26 मे) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे आमने-सामने उभे ठाकणार आहेत. हा सामना जिंकत या दोन्हीपैकी एक संघ अंतिम सामन्याचे तिकीट मिळवेल. या सामन्यात गुजरात संघासाठी फायद्याची बाब अशी की, हा सामना घरच्या मैदानावर म्हणजेच अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. गुजरातला या मैदानावर खेळण्याचा भरपूर अनुभव आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने मागील सामन्यात चेन्नईच्या चेपॉक मैदानात खेळताना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला 81 धावांनी पराभूत केले होते. अशात मुंबई संघाचा आत्मविश्वासही गगनाला भिडलेला असेल. या सामन्यात विजय मिळवून मुंबईही अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाविरुद्ध दोन हात करण्याचा प्रयत्न करेल. गुजरात आणि मुंबई दोन्ही संतुलित संघ आहेत, पण त्यांच्यावर दबावही असेल. जो संघ या दबावाचा सामना करण्यात यशस्वी ठरेल, तोच संघ विजय मिळवेल.
खेळपट्टी आणि हवामान
खेळपट्टीतून फलंदाजांना चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण, या मैदानावर धावांचा पाठलाग करताना अधिक दबाव राहील. हवामानाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे बोलले जात आहे. पावसाचीही कोणतीच शक्यता वर्तवली जात नाहीये.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
गुजरात विरुद्ध मुंबई (Gujarat vs Mumbai) संघातील दुसरा क्वालिफायर सामना (Second Qualifier Match) भारतीय प्रमाणवेळेनुसार, 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. त्यापूर्वी 7 वाजता उभय संघात नाणेफेक होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. तसेच, डिजिटलवर हा सामना जिओ सिनेमा ऍपवर पाहता येईल. (ipl 2023 gt vs mi 2nd qualifier preview pitch predicted eleven live streaming know here)
उभय संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स
वृद्धिमान साहा, शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेविड मिलर, दसून शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद/जोश लिटिल, मोहम्मद शमी, मोहित शर्मा
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयुष चावला, जेसन बेहरनडॉर्फ, आकाश मढवाल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही सुपरस्टार खेळाडू घडवतो”, रोहितने सांगितली चॅम्पियन मुंबई इंडियन्सची खासियत
VIDEO: लाजिरवाण्या पराभवानंतर संतापले लखनऊचे संघमालक, थेट मेंटर गंभीरलाच झापले