आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. हा आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना ठरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 212 धावा बनवल्या. राजस्थानसाठी सलामीला आलेल्या युवा यशस्वी जयस्वाल याने एकहाती संघाची धुरा वाहत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
That Maiden IPL Century feeling
A TON in 1️⃣0️⃣0️⃣0️⃣th IPL Match 🙌🏻@ybj_19 departs after 124 off just 62 deliveries 👏🏻👏🏻#IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/rV3X7AUSfc
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून सर्वांना चकित करत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय जोस बटलर व यशस्वी जयस्वाल यांनी योग्य ठरवला. दोघांनी 7 षटकात 72 धावा चोपल्या. बटलर बाद झाल्यानंतरही जयस्वाल याने आपला फॉर्म कायम राखत आणखी एक अर्धशतक पूर्ण केले.
एका बाजूने इतर फलंदाज बाद होत असताना यशस्वीने आपली खेळी पुढे नेली. त्याने सर्वच गोलंदाजांचा समाचार घेत 53 चेंडूवर आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे तो याच मैदानावर मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असतो.
अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने 62 चेंडूवर 16 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 124 धावा केल्या. कोणत्याही अनकॅप्ड खेळाडूने आयपीएलमध्ये केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी हा विक्रम पॉल वॉल्थटीच्या नावे होता. त्याने 2011 मध्ये पंजाबसाठी 120 धावा केल्या होत्या.
(IPL 2023 Rajasthan Royals Young Lad Yashasvi Jaiswal Hits Maiden IPL Century Against Mumbai Indians In IPL 1000 Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेपॉकवर चेन्नई पुन्हा चीत! अखेरच्या चेंडूवर पंजाबने पार केले 201 धावांचे आव्हान
IPL 2023: 1000 व्या आयपीएल सामन्यात राजस्थानने जिंकला टॉस, यजमान मुंबई करणार प्रथम गोलंदाजी