राजस्थान रॉयल्स संघ इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही. मात्र, संघाने हंगामात संमिश्र कामगिरी केली. राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जयसवाल यानेही आपल्या जबरदस्त फलंदाजीने अनेक विक्रम नावावर केलेच, पण दिग्गजांनाही कौतुक करायला भाग पाडले. आता राजस्थान प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या युवा खेळाडूची जोरदार प्रशंसा केली आहे. गावसकर स्पष्ट म्हणालेत की, जयसवाल ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याला लवकरच भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे.
जयसवाल आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याच्याविषयी मोठे भाष्य केले. ते म्हणाले की, “यशस्वी आपल्या फॉर्मच्या शिखरावर आहे आणि त्याला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही मिळाली पाहिजे. मला वाटते की, तो आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच, त्याला संधी मिळाली पाहिजे. जेव्हा कोणताही खेळाडू सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतो, तेव्हा त्याला संधी मिळालीच पाहिजे. यावेळी जयसवालचा आत्मविश्वास गगनाला भिडत आहे.” गावसकरांनी असेही म्हटले की, जयसवालकडे भारताकडून खेळण्याची योग्य मन:स्थिती आणि तंत्र आहे.
जयसवालमध्ये काय आहे खास?
गावसकरांनी पुढे म्हटले की, “जर कोणत्याही फलंदाजाने टी20 क्रिकेट प्रकारात 20-25 चेंडूंवर 40-50 धावा केल्या, तर त्याने आपल्या संघासाठी खूपच चांगले काम केले आहे. मात्र, जर तो फलंदाज सलामीवीर असेल, तर तुम्हाला वाटेल की, त्या फलंदाजाने 15 षटके खेळावे. जर त्या फलंदाजाने शतक ठोकले, तर तुमचा संघ सहजरीत्या 190-200हून अधिक धावा करेल. त्यामुळे ज्या अंदाजात जयसवालने या हंगामात फलंदाजी केली आहे, त्यामुळे मी खूपच खुश आहे. तो एक तंत्रशुद्ध फटके मारणारा फलंदाजही आहे.”
जयसवालने चोपल्या 625 धावा
यशस्वी जयसवाल याने या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना या हंगामात 14 सामन्यात 48.08 625 धावा चोपल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने या हंगामात 13 चेंडूत आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकही झळकावले आहे. वादळी फलंदाजीच्या जोरावर त्याने अनेक दिग्गजांचे लक्ष वेधले आहे. (ipl 2023 sunil gavaskar prediction yashasvi jaiswal will debut for team india soon read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Qualifier 1: टॉसचा निकाल पंड्यासेनेच्या पारड्यात, CSK देणार का कडवी झुंज?
प्ले ऑफ्स किंग होता रैना! धडाकेबाज कामगिरीने सार्थ केलेले मि.आयपीएल नाव