---Advertisement---

शुबमन गिलनं गुजरातच्या कॅम्पमध्ये कोणाला अंगठी दिली? सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

---Advertisement---

गुजरात टायटन्सचा फलंदाज डेव्हिड मिलरचं नुकतंच लग्न झालं. तो आता आयपीएल खेळण्यासाठी भारतात पोहोचला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल याच्यासोबत डेव्हिड मिलर आणि त्याची पत्नी दिसत आहेत. शुबमन गिल डेव्हिड मिलरला अंगठी देतो. त्यानंतर मिलर आपल्या पत्नीच्या बोटात अंगठी घालतो आणि तिचं चुंबन घेतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. गुजरात टायटन्सनं 22 मार्चला हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून पोस्ट केला. त्याचवेळी, या व्हिडिओमध्ये राशिद खान, केन विल्यमसन, विजय शंकर आणि साई सुदर्शन यांसारखे खेळाडू दिसत आहेत. सोशल मीडिया यूजर्सकडून या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत आहे. यूजर्स व्हिडिओवर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ 24 मार्चला आपल्या आयपीएल मोहिमेची सुरुवात करेल. त्यांचा पहिला सामना पाच वेळची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे. दोन्ही संघ रविवारी संध्याकाळी आमनेसामने येतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.

यापूर्वी, कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं 2022 मध्ये आपल्या पहिल्या हंगामातच विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर ते आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचले. परंतु विजेतेपदाच्या सामन्यात त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.

आता आयपीएल 2024 साठी हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा भाग असणार नाही. तो मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. हार्दिक पांड्याच्या जागी शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करताना दिसेल.

गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ – शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशिद खान, जोश लिटल, मोहित शर्मा, स्पेन्सन जॉन्सन, शाहरुख खान, उमेश यादव, रॉबिन मिन्ज, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुतार.

महत्त्वाच्या बातम्या-

आठवडाभरापूर्वीच स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर गेला, आता आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात बनला ‘प्लेअर ऑफ द मॅच’!

फाफ डू प्लेसिसनं सांगितलं चेन्नईविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाला, “पहिल्या डावात आम्ही…”

कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यासाठी ‘या’ खेळाडूंवर लावा पैज, KKR Vs SRH ड्रीम 11 टीम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---