१२ आणि १३ फेब्रुवारीला झालेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाने अनेक खेळाडू आनंदी झाले तर अनेक खेळाडूंची निराशा झाली. या लिलावात ४ भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नाही आणि आता त्यांची आयपीएल कारकीर्द कदाचित संपल्यात जमा आहे. या चार भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सुरेश रैना, इशांत शर्मा, पियुष चावला आणि अमित मिश्रा यांचा समावेश आहे. या लिलावात पहिल्या फेरीत या चार खेळाडूंना कोणीही विकत घेतले नव्हते, परंतु दुसऱ्या फेरीतही त्यांची नावे घेण्यात आली नाहीत.
सुरेश रैना, पियुष चावला आणि अमित मिश्रा हे आता भारतीय संघाचा भाग नाहीत, तर इशांत शर्मा कसोटी संघात खेळतो, पण आता कसोटी क्रिकेटमध्येही तो काही खास कामगिरी करत नाही. त्यांना खरेदी न करण्यामागे त्यांचे वय हेच सर्वात मोठे कारण आहे. तसेच या खेळाडूंनी गेल्या मोसमात ते खेळत असलेल्या फ्रँचायझींसाठी काही विशेष कामगिरी केली नव्हती.
मागच्या हंगामात सुरेश रैनाने अत्यंत खराब कामगिरी केली होती, तर अमित मिश्राला खेळण्याची जास्त संधी मिळाली नव्हती. तसेच पियुष चावला आणि इशांत शर्मा यांनाही फारशी संधी मिळाली नाही. आता संघ त्यांच्या पुढे जाऊन नवीन खेळाडू घेण्याच्या विचारात होते आणि याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.
कोणाला दुखापत झाल्यास त्यांचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु यानंतर आता या चार खेळाडूंची आयपीएल कारकीर्द जवळजवळ संपली आहे. आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असलेल्या सुरेश रैनाने आयपीएलमध्ये २०५ सामन्यात ५५२८ धावा केल्या. अमित मिश्राने १५४ सामन्यात १६६ विकेट घेतल्या. पियुष चावलाने १६५ सामन्यात १५७ विकेट घेतल्या आहेत. तर इशांत शर्माने ९३ सामन्यात ७२ विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल २०२२ ही स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खेळवली जाण्याची शक्याता आहे. मेगा लिलावात सर्वाधिक बोली मुंबई इंडीयन्स संघाने इशान किशनवर लावली आहे. मेगा लिलावात आता सर्व संघानी उत्तम खेळाडू निवडले असले तरी मैदानात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल स्पर्धेचे सर्व १४ हंगाम खेळणारे हे ४ शिलेदार, १५ व्या हंगामात राहिले अनसोल्ड; पाहा यादी
भारताला तिसरा धक्का, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर टी२० मालिकेतून बाहेर; ‘हे’ आहे कारण
थँक्यू चिन्नाथाला! साथ सुटल्यानंतर रैनासाठी सीएसकेचे ‘खास’ ट्विट