मुंबई । आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन यंदा युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे संघ दुबईला पोचल्यावर कोराना व्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांना सहा दिवस क्वारंटाइनचे पालन करावे लागणार आहे. बुधवारी आयपीएलमधील संघ मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आयपीएलच्या एका फ्रँचायझी अधिका-याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलतांना सांगितले की, “आम्ही आरोग्याच्या प्रश्नांवर जोखीम घेऊ शकत नाही. संघातील सदस्यांना सहा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल.”
दुबई सरकारच्या हेल्थ प्रोटोकॉलनुसार, तेथे पोहचल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल. जर कुणाचा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आला तर चौदा दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.
बैठकीत जैवसुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर कॉन्फरन्सिंग कॉलद्वारे चर्चा करण्यात आली. प्रत्येक फ्रेंचायझीला स्वतःची बायोसाफ्टीची व्यवस्था करावी लागेल, तर बीसीसीआयने नियुक्त केलेली एजन्सी या संपूर्ण प्रकरणाची देखरेख करेल. दरम्यान, संघ मालकांनी आपापल्या संघाला 24 सदस्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यास सहमती दर्शविली.
तसेच विव्होने आयपीएलचा मुख्य प्रायोजक होण्यास यंदा नकार दिला आहे. विव्होने माघार घेतल्याने फ्रेंचायझी आणि बीसीसीआय या दोघांनाही त्रास होणार आहे. या करारातून जो काही महसूल मिळतो त्यातील 60 टक्के हिस्सा मंडळाला आणि 40 टक्के फ्रँचायझींला प्राप्त होतो. संघ मालकांनी बोर्डाकडून नुकसान भरपाई घेण्याचा निर्णय घेतला आहे का, असे विचारले असता फ्रँचायझी अधिकार्याने सांगितले की या विषयावर कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
जाणून घ्या रोहित शर्माची पहिली कमाई किती होती आणि ती कशी खर्च केली ?
…म्हणून सोशल मीडियावर विराट कोहलीची केली जात आहे चेष्टा
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप
अवघे १९ वय असताना वनडे क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा आकीब जावेद
आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर