आयपीएल इतिहासातील पहिला सामना १८ एप्रिल, २००८ रोजी खेळण्यात आला. तो सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळण्यात आला होता. तसं तर तो सामना केकेआरचा फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमच्या नाबाद १५८ धावांच्या तुफान दीडशतकी खेळीसाठी ओळखला जातो. तरी जसजशी ती स्पर्धा पुढे गेली तसतशी गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी पहायला मिळाली.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यातील पहिली विकेट ही आरसीबी (Royal Challengers Bangalore) संघाचा गोलंदाज झहीर खानने घेतली होती. त्याने केकेआरचा (Kolkata Knight Riders) कर्णधार सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) विकेट घेतली होती.
आयपीएलच्या (IPL) पहिल्या मोसमात ३ खेळाडूंनी हॅट्रिक विकेट घेतली होती. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या २ खेळाडूंनी, तर दिल्ली डेअरडेविल्सच्या (आताचे दिल्ली कॅपिटल्स) एका खेळाडूने हा कारनामा केला होता. याव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाच्या सोहेल तन्वीरने ११ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तो पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला ही कॅप दिली जाते) मिळवणारा पहिला खेळाडूही बनला होता. याबरोबरच त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटके टाकताना १४ धावा देत ६ विकेट्स चटकावले होते.
तन्वीर व्यतिरिक्त आयपीएलच्या पहिल्या मोसमात लक्ष्मीपती बालाजी आणि अमित मिश्रा यांनी एका सामन्यात प्रत्येकी ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. त्यांच्याव्यतिरिक्त शोएब अख्तर, तन्वीर, दिलहारा फर्नांडो, मखाया एंटिनी, उमर गुल, ग्लेन मॅकग्रा, एल्बी मॉर्केल आणि यो महेश या खेळाडूंनीही आयपीएलच्या एका सामन्यात प्रत्येकी ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.
या लेखात आपण त्या गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या पहिल्या मोसमात सर्व संघांकडून पहिली विकेट घेतली आहे.
आयपीएलच्या पहिल्या मोसमात सर्व संघांकडून पहिली विकेट घेणारे गोलंदाज- IPL History First Wicket from Every Team Bowler
१. गोलंदाज- झहीर खान (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), फलंदाज- सौरव गांगुली (कोलकाता नाईट रायडर्स)
२. गोलंदाज- इशांत शर्मा (कोलकाता नाईट रायडर्स), फलंदाज- राहुल द्रविड (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
३. गोलंदाज- ब्रेट ली (किंग्स इलेव्हन पंजाब), फलंदाज- पार्थिव पटेल (चेन्नई सुपर किंग्ज)
४. गोलंदाज- मनप्रीत गोनी (चेन्नई सुपर किंग्ज), फलंदाज- करण गोयल (किंग्ज इलेव्हन पंजाब)
५. गोलंदाज- ग्लेन मॅकग्रा (दिल्ली डेअरडेविल्स), फलंदाज- तरुवर कोहली (राजस्थान रॉयल्स)
६. गोलंदाज- शेन वॉटसन (राजस्थान रॉयल्स), फलंदाज- विरेंद्र सेहवाग (दिल्ली डेअरडेविल्स)
७. गोलंदाज- आरपी सिंह (डेक्कन चार्जर्स), फलंदाज- ब्रेंडन मॅक्युलम (कोलकाता नाईट रायडर्स)
८. गोलंदाज- धवल कुलकर्णी (मुंबई इंडियन्स), फलंदाज- शिवनारायण चंद्रपॉल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
वाचनीय लेख-
-अजिंक्य रहाणे जेव्हा जेव्हा शतक करतो, तेव्हा तेव्हा टीम इंडिया…
-जेव्हा ग्राऊंड्समनला दिला होता मॅन ऑफ द मॅच पुरस्कार
-२००८ विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील खेळाडू सध्या आहेत तरी कुठे?