इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात शनिवारपासून (२६ मार्च) होणार आहे. त्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. सीएसकेच्या वेबसाईटवरून शेअर करत धोनीने भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजावर सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. या हंगामात तो सीएसकेचा कर्णधार म्हणून दिसणार आहे.
सीएसके संघाचे खेळाडू असण्याबरोबरच त्या दोघांमध्ये चांगली मैत्री सुद्धा आहे. जे मैदानावर आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा पहायला मिळते. आता धोनीने (MS Dhoni) संघाची कमान जडेजाकडे सोपवल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या काही आठवणी ताज्या केल्या आहेत. असाच एक क्षण २०१८ च्या आयपीएल सामन्यादरम्यान घडला, जेव्हा धोनीने एक चेंडू अडवला आणि जडेजाला इतका घाबरवला की, जड्डूही क्षणभर घाबरला. मात्र, नंतर धोनीच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्याच्या जीवात जीव आला.
सन २०१८च्या हंगामामध्ये चेन्नई संघ हैदराबादविरुद्ध (SRH) एक सामना खेळत होता. यादरम्यान हरभजन सिंगच्या चेंडूवर शिखर धवन चेंडू सावकाश हातांनी खेळत मिड-विकेट भागात धावला. येथे एकही क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे धोनी स्वत: यष्टीरक्षकाच्या जागेवरून चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षणासाठी धावला. डीप मिडविकेटवर उभा असलेला रवींद्र जडेजाही क्षेत्ररक्षणाच्या उद्देशाने चेंडूजवळ पोहोचला.
धोनीने चेंडू अडवला आणि त्याने तो थेट गोलंदाजी एन्डला टाकू शकला असता, पण त्याने तिकडे चेंडू टाकला नाही. पुढे त्याने चेंडू उचलला आणि असा काही प्रँक केला की, ज्यामुळे जडेजा घाबरला. चेंडू उचलताच धोनीने अशी कृती केली की, तो चेंडू जडेजाच्या तोंडावर फेकत असल्याचे भासले.
When ❄️ stopped the 🚀@msdhoni had @imjadeja hiding for cover last season, will he give RCB's bowlers the same treatment tonight? #CSKvRCB #VIVOIPL 2019
Watch 📹: https://t.co/mjD4fQt023 pic.twitter.com/3Ymnf6Kfnr
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2019
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
भीतीपोटी जडेजाने तोंड वाचवण्याचा प्रयत्न केला. धोनीने हातातून चेंडू सोडला नसला तरी हे दृश्य पाहून केवळ जडेजाच घाबरला नाही, तर प्रेक्षक आणि समालोचकही क्षणभर आश्चर्यचकित झाले, तरीही धोनीचे प्रँक पाहून सर्वजण खुश झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
डोळ्याचं पारणं फेडणारा कॅच! पॅट कमिन्सनं पाकिस्तानच्या अझर अलीला ‘असं’ धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहाच
कशी असेल आयपीएल २०२२साठी सज्ज असलेल्या मैदानांची खेळपट्टी? ‘या’ ४ मैदानांवर १० संघ करणार धमाल
जड्डूचा ‘सर’ जडेजा करण्यात माही भाईचाच आहे सिंहाचा वाटा; बोटाला धरून शिकवलंय