८० आणि ९०च्या दशकातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, ते कलागुणांनी श्रीमंत होते, काहींची स्वत:ची खेळाची खास शैली होती. तसेच काहीजणांमध्ये तर मनोरंजन करून मैदानात गर्दी खेचण्या इतपत क्षमता होती. परंतु हे खेळाडू भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलचा भाग बनू शकले नाहीत.
आपण त्या खेळाडूंबद्दल विचार करून पाहिले तर, आयपीएलमध्ये त्या काळी कृष्णमचारी श्रीकांतला पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर हेल्मेट न घालता शॉट खेळता आला असता का?
त्याचबरोबर बेन स्टोक्सबद्दल काय विचार कराल? तो मनोज प्रभाकरच्या मध्यमगती गोलंदाजीवर कशाप्रकारे खेळला असता? तसेच जर कपिल देव यांना १९ व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करावा लागला असता तर, बुमराहने कपिल देव यांना कशाप्रकारे चेंडू टाकला असता?
असेच सारे प्रश्न सर्व चाहत्यांना पडले असतील. ज्या खेळाडूंना आयपीएलचा भाग होता आले नव्हते. परंतु जर ते आजच्या काळातही क्रिकेट खेळत असते तर अंबानी आणि शाहरूख खान यांसारख्या संघमालकांना या दिग्गज खेळाडूंवर अधिक रक्कम लावून आपल्या संघात सामील करून घेण्यात कसलीच अडचण आली नसती. या लेखात आपण अशाच १० खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.
आयपीएल खेळण्यास मुकलेले भारताचे १० खेळाडू-
१. कपिल देव-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) हे भारताच्या सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाजांपैकी एक आणि मोठे षटकार ठोकण्यात पारंगत होते. ते नवीन चेंडूने गोलंदाजीला सुरुवात करण्यापासून मधल्या षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकातही गोलंदाजी करू शकत होते.
गोलंदाजीबरोबरच फलंदाजी करताना शेवटच्या षटकातील चेंडूही सीमारेषेच्या (बाऊंड्री) पलीकडे पोहोचविण्यास त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नव्हती. आयपीएलमधील कोणत्याही संघाला कपिल देव यांच्यासाठी चेक बुकवरील संख्या वाढविण्यास कसलीही समस्या आली नसती, असं म्हटल्यास त्यात काही वावगं ठरणार नाही.
२. कृष्णमचारी श्रीकांत-
कृष्णमचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) हे आपल्या पिढीपेक्षा थोडे पुढचे खेळाडू होते. त्यांच्या आक्रमक फलंदाजीची शैली चाहत्यांना आणि प्रेक्षकांना मैदानापर्यंत खेचून आणत होती. ते हेल्मेट न घालता वेस्ट इंडीजचे वेगवान गोलंदाज एँडी रॉबर्ट्सच्या (Andy Roberts) चेंडूवर पुल शॉट खेळत षटकार ठोकत होते. तसेच पॅट्रिक पीटरसनच्या गोलंदाजीवर हुक करत चेंडू बाऊंड्रीच्या पलीकडे पाठवत होते.
८० च्या दशकातही ते जवळपास १०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होते. कदाचित जर ते आता आयपीएल खेळत असते तर, चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) श्रीकांत यांना आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी इतर फ्रंचायझी संघांना मागे टाकले असते.
३. विनोद कांबळी-
भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) हा असा क्रिकेटपटू होता. जो आजच्या काळातील आयपीएलसाठी बनला होता. फलंदाजीच्या कौशल्याबरोबरच युवा खेळाडूंना आकर्षित करणाऱ्या वेशभूषेमुळे तो या आयपीएलमध्ये स्टार बनला असता.
९०च्या दशकात तो हार्दिक पंड्यासारखा (Hardik Pandya) आजच्या क्रिकेटपटूंपेक्षा १० पटीने पुढे होता. त्याच्याकडे फिरकीपटूंविरुद्ध कमालीचे मोठ-मोठे फटके मारण्याची क्षमता होती. जर तो आता आयपीएलमध्ये असता तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना दिसला असता.
४. मोहम्मद अझरूद्दीन-
भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद अझरूद्दीनला सुरुवातीच्या काही षटकांनंतर मधल्या षटकांमध्ये फलंदाजी करताना क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू खेळत चौकार ठोकण्यात किंवा पळत पळत धावा घेण्यास कोणतीच अडचण येत नव्हती.
फीटनेस आणि क्षेत्ररक्षणात प्रत्येक सामन्यात १५ धावा वाचवण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवत होती. आपला घरचा संघ हैद्राबाद किंवा आवडीचा संघ कोलकाता या फ्रंचायझींना अझरुद्दीनला संघात घ्यायला कोणतीच अडचण आली नसती.
५. अजय जडेजा-
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीपूर्वी (MS Dhoni) भारताचा सर्वात समजूतदार क्रिकेटपटूंपैकी समजला जाणारा क्रिकेटपटू म्हणजेच अजय जडेजा (Ajay Jadeja) होय. त्याच्याकडे सामन्याची सुरुवात आणि अंतिम षटकात फलंदाजी करण्याची अप्रतिम क्षमता होती. तो धोनीप्रमाणेच सामन्यात फिनिशरची भूमिकाही उत्तमरित्या पार पाडू शकत होता.
अझरप्रमाणेच मैदानावरील क्षेत्ररक्षणातील त्याची चपळता ही आजच्या निकषांप्रमाणे होती. तसेच गोलंदाजीमध्ये हात आजमावण्याची क्षमता त्याला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक बनवत होती. तो आताही क्रिकेट खेळत असता तर तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळणारा उत्कृष्ट खेळाडू असता.
६. मनोज प्रभाकर-
नवीन चेंडूने स्विंग आणि शेवटच्या षटकांत मध्यमगतीची गोलंदाजी मनोज प्रभाकरला (Manoj Prabhakar) आयपीएलसाठी उत्तम गोलंदाज बनवते. त्यांच्यात मोठ-मोठे फटके मारण्याची अधिक क्षमता नव्हती. परंतु दुसऱ्या बाजूने चांगली फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाची साथ देण्याची उत्तम क्षमता होती. कदाचित जर ते आयपीएल खेळत असते तर, त्यांना राजस्थान रॉयल्स (Rajastan Royals) या फ्रंचायझी संघात आपली कामगिरी दाखविण्याची पूर्ण संधी मिळाली असती.
७. रॉबिन सिंग-
भारतीय संघाचे माजी खेळाडू रॉबिन सिंग (Robin Singh) हे असे अष्टपैलू क्रिकेटपटू होते, ज्यांच्यावर कोणत्याही आयपीएल फ्रंचायझी संघाला पैशांचा पाऊस पाडण्यात कोणतीही अडचण आली नसती. रॉबिन सिंग हे मोठे फटके मारण्यात तरबेज होते. तसेच मध्यम गतीने गोलंदाजी करण्याबरोबरच क्षेत्ररक्षणातील त्यांची चपळता त्यांना कोणत्याही कर्णधाराचा आवडता खेळाडू बनवते.
कदाचित जर ते आयपीएलमध्ये खेळत असते तर ते अष्टपैलू क्रिकेटपटूंवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) या संघाकडून खेळले असते.
८. रवी शास्त्री-
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असणारे रवी शास्त्री यांच्यात सामन्याची सुरुवात करण्याची अप्रतिम क्षमता होती. तसेच ते सलामीबरोबरच कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकत होते. फिरकीपटूंविरुद्ध सहजपणे षटकार मारण्याच्या क्षमतेमुळे ते आयपीएलमध्ये सर्वांचे आवडते क्रिकेटपटू बनले असते. जर ते आयपीएलमध्ये असते तर त्यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व केले असते.
९. मनिंदर सिंग-
भारतीय संघाच माजी फिरकीपटू गोलंदाज मनिंदर सिंग (Maninder Singh) जेव्हा गोलंदाजी करत होते, तेव्हा ते योग्य ठिकाणी गोलंदाजी करत होते. आजच्या काळात टी२० क्रिकेटमध्येही त्यांच्या गोलंदाजीविरुद्ध धावा करणे कठीण झाले असते. जर ते आयपीएलमध्ये असते तर किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) संघाला त्यांना आपल्या संघात घेण्यात काहीच अडचण आली नसती.
१०. जवागल श्रीनाथ-
भारतीय संघातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या जवागल श्रीनाथकडे (Javagal Srinath) वेगाने गोलंदाजी करण्याबरोबरच उसळी आणि चेंडू आतमध्ये आणण्याची क्षमता होती. तो कोणत्याही कर्णधाराचा आवडता गोलंदाज होता. तो सुरुवातीच्या षटकांमध्ये संघाला विकेट्स मिळवून देत होता. तसेच फलंदाजीनेही कधी-कधी योगदान देऊ शकत होता.
जर तो आयपीएलमध्ये असता तर, नक्कीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाची योग्य निवड बनला असता.
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख-
-गंभीर म्हणतो, फक्त हा खेळाडू संघात हवा होता, केकेआरने जिंकली असती अनेक विजेतेपदं
-आयपीएल झाली नाही, पण हा खेळाडू ठरला आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन
-धोनी नसेल तर चेन्नई सुपर किंग्जचं काही खरं नाही
-हा खेळाडू म्हणतो, धोनीसारखा कॅप्टन होणे नाही
-करोना विरुद्धच्या लढाईत अजय ठाकूर असे करतोय नेतृत्व
-विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
-जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
-आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल
-आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
-आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
-या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
-आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू