---Advertisement---

“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली

---Advertisement---

आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नईने 20 षटकांत 4 बाद 179 धावा केल्या. चेन्नईचा सलामीवीर फाफ डू प्लेसीने 47 चेंडूत 58 आणि तर अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने 25 चेंडूत नाबाद 45 धावा केल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 13 चेंडूत 33 धावांची धडाकेबाज खेळी केली.

प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 5 गडी राखून हे लक्ष्य गाठले. यावेळी दिल्लीकडून शिखर धवनने आयपीएलचे पहिले शतक झळकावले आणि 58 चेंडूत नाबाद 101 धावा फटकावल्या. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने 3 षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

शिखर धवनच्या शतकानंतर ट्विटरवर जबरदस्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर त्याची विकेट घेण्यात अपयशी ठरलेल्या सीएसकेवर चाहत्यांनी टीका केली आहे.

https://twitter.com/Cric_Auditor/status/1317512513332731905?s=20

https://twitter.com/Romeo_theboss/status/1317523013777072129?s=20

या सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण केले. खराब क्षेत्ररक्षण हे चेन्नईने हा सामना गमावण्यासाठी महत्त्वाचे कारण ठरले. डावाच्या सुरुवातीला क्षेत्ररक्षक दीपक चहरने धवनचा झेल सोडला तर डावाच्या अखेरच्या षटकांत सामना रंगतदार स्थितीत असताना अंबाती रायडूनेही धवनला जीवदान दिले.

दिल्ली कॅपिटल्सचा हा या हंगामातील 7 वा विजय होता. 14 गुणांसह दिल्ली गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीचा पुढील सामना 20 ऑक्टोबरला किंग्स इलेव्हन पंजाबशी होईल.

महत्त्वाच्या बातम्या- 

IPL 2020 : ‘गब्बर’चे वादळी शतक, थरारक सामन्यात दिल्लीकडून चेन्नईचा ५ विकेट्सने पराभव

मोठ-मोठ्या गोलंदाजांची चिरफाड करणारा संजू सॅमसन ‘या’ गोलंदाजापुढे होतो गपगार

ठरलं तर! ‘या’ तारखेपासून भारतात होणार देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात; गांगुलीची घोषणा

ट्रेंडिंग लेख-

आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’

दुखापतग्रस्त असतानाही गोलंदाजी करण्याची जिद्द दाखवणाऱ्या कुंबळेचा आज वाढदिवस…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---