बुधवारी(१४ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना पार पडला. या सामन्यात आयपीएलमधील वेगवान चेंडूचा विक्रम मोडला गेला. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या एन्रीच नॉर्किए या वेगवान गोलंदाजाने १५६.२ किमी प्रतितास वेगाने एक चेंडू टाकला. यावेळी त्याने डेल स्टेनचा विक्रम मोडला. स्टेनने आयपीएलमध्ये १५४.४ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता.
राजस्थानविरुद्ध आपल्या तिसऱ्या षटकात गोलंदाजी करताना नॉर्किएने आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू फेकला. मात्र या सर्वाधिक वेगवान चेंडूवर राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जॉस बटलरने चौकार ठोकला. पण पुढच्याच चेंडूवर त्याने बटलरला बाद देखील केले. नॉर्किए हा खेळाडू कोण आहे याबाबदल जाणून घेऊया.
१. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या नॉर्किए हा जलद गोलंदाजी करतो. जलद गोलंदाजीतील दिग्गज डेल स्टेनने अनेक वेळा नॉर्किएचे कौतुक केले आहे. आयपीएलमध्ये तो सतत ताशी १५० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करीत आहे.
२. त्याचा जन्म दक्षिण आफ्रिकेच्या पोर्ट एलिझाबेथ शहराच्या पूर्वेस उतेनहेज येथे झाला. या शहरात आफ्रिकेतील सर्वात मोठे फोक्सवॅगन कार कारखाना असून नेल्सन मंडेला मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीमधून त्याने ‘फाइनेंशियल प्लॅनिंग’विषयात पदवी घेतली आहे. शिक्षण घेत असतानाच त्याने वेगवान गोलंदाजीचे कौशल्य आत्मसात केले.
३. २०१८ मध्ये प्रथमच, मजांसी सुपर लीग दरम्यान तो चर्चेत आला. येथे त्याने आपल्या जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तेव्हा त्याने केपटाऊनसाठी ८ बळी घेतले.
४. नॉर्किएला २०१९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली; तर त्याने २०१९ मध्ये भारताविरुद्ध पुणे कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले. टी-२० मध्येही त्याने भारताविरुद्धच पदार्पण केले.
५. गेल्या वर्षी दुखापतीमुळे नॉर्किएने विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी गमावली. गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघात स्थान दिले होते. पण खांद्याच्या दुखापतीमुळे तो संघात सामील होऊ शकला नाही. कोलकाताने त्याला २० लाखांच्या बेस प्राइसवर खरेदी केले होते.
६. यावर्षी ख्रिस वॉक्सच्या जागी दिल्ली कॅपिटल्स संघात नॉर्किएचा समावेश करण्यात आला. वोक्सने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे त्याला संधी मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
-ताशी १५६.२२ किमी! दिल्लीच्या गोलंदाजाने फेकला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू
महान फिरकीपटू मुरलीधरनचा बायोपिक वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण
‘मला जाऊ द्या ना घरी’ लावणीवर विराटचा ठेका, पाहा जबरदस्त मीम्स
ट्रेंडिंग लेख –
काळा डाग! ‘आयपीएल’ इतिहासातील पाच घटना ज्यामुळे स्पर्धेची जगात बदनामी झाली
IPL 2020 : अफाट कौशल्याने परिपूर्ण असलेले ४ खेळाडू, ज्यांना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर