आयर्लंड आणि झिम्बाब्वे (Ireland vs Zimbabwe) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत एक अजब घटना पाहायला मिळाली. या सामन्यात आयर्लंडचा संघ फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांनी धावून पाच धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी अशा घटना पाहायला मिळाल्या नाहीत. रविवारी (28 जुलै) ऍंडी मॅकब्रायन व लॉरकन टकर या दोन फलंदाजांनी या पाच धावा काढल्या.
आयर्लंड संघ फलंदाजी करत असताना झिम्बाब्वेसाठी रिचर्ड नगरवा याने अठरावे षटक टाकले. या षटकात मॅकब्रायन याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक फटका खेळला. चेंडू अगदी संथ गतीने चालला असताना, फलंदाजांनी पळून धावा पूर्ण केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या टेंडाई चटारा याने झेप घेत चेंडू चौकार जाण्यापासून वाचवला. हे सर्व घडत असताना चटारा याचा तोल गेला. यादरम्यान मॅकब्रायन व लॉरकन यांनी पाच धावा पूर्ण केल्या.
आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे कसोटी सामन्यादरम्यान क्रिकेटमधील अत्यंत दुर्मिळ घटना घडली आहे.
ओव्हर थ्रो न होता आयर्लंडने धावत 5 धावा पूर्ण केल्या आहेत….😅❣️#IREvZIM @Sports_Katta @kreedajagatpic.twitter.com/eOa4g40GJF
— एक क्रिकेटवेडा (@onlyforcricket0) July 28, 2024
या सामन्याचा विचार केला गेल्यास, झिम्बाब्वे संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले होते. त्यांनी आपल्या पहिल्या डावात 210 धावा केल्या. त्याच्या प्रतिउत्तरात आयर्लंड संघाने आपल्या पहिल्या डावात 250 धावा करत 40 धावांची आघाडी घेतली. झिम्बाब्वेचे फलंदाज दुसऱ्या डावात केवळ 197 धावा बनवू शकले. त्यामुळे आयर्लंड संघापुढे 158 धावांचे आव्हान होते. त्यांनी सहा गडी गमावत, हे आव्हान पार करून विजय साजरा केला.
सध्या आयर्लंड व झिंबाब्वे हे संघ फारसे कसोटी क्रिकेट खेळत नाहीत. आयर्लंड संघाला पूर्ण सदस्यत्व प्राप्त झाले असले तरी, त्यानंतर त्यांनी केवळ बांगलादेश अफगाणिस्तान व इंग्लंडविरुद्ध सामने खेळले आहेत. तर, झिम्बाब्वे संघाचा पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा –
फलंदाजीत फेल, क्षेत्ररक्षणात चूक; आशिया चषक गमावल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर होतेय ट्रोल
श्रीलंकेसाठी दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कामिंदू मेंडिस पहिलाच गोलंदाज नव्हे; 28 वर्षांपूर्वीही झालंय असं
IND vs SL : ओल्या मैदानामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या टी20 सामन्याच्या नाणेफेकीला उशीर