Harmanpreet Kaur :- कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्त्वाखाली आशिया चषकात दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र सपशेल फेल ठरलाय. डंबुला येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याची संधी भारतीय संघाच्या हातून हुकली. या पराभवानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला क्रिकेटरसिकांनी धारेवर धरले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 165 धावा केल्या. या डावात भारताकडून सलामीवीर स्मृती मंधाना हिने अर्धशतकी खेळी केली. 47 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने तिने 60 धावा फटकावल्या. मात्र इतर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्याकडून अंतिम सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र 11 चेंडूत केवळ 11 धावा करत तिने सर्वांची निराशा केली.
Sack Harmanpreet Kaur pic.twitter.com/hvVygmnpF7
— Fearless🦁 (@ViratTheLegend) July 28, 2024
प्रत्युत्तरात श्रीलंकन फलंदाजांपुढे भारतीय गोलंदाजांची अवस्था बिकट झाल्याचे दिसले. कर्णधार चमारी अट्टापट्टू हिने 43 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 61 धावांची सामना विजयी खेळी केली. तसेच हर्षिता समाराविक्रमा हिनेही नाबाद 69 धावांचे विजयी योगदान दिले. यावेळी हरमनप्रीतच्या क्षेत्ररक्षणातील त्रुटी दिसून आल्या. क्षेत्ररक्षण करताना हरमनप्रीतने मोक्याच्या क्षणी श्रीलंकन फलंदाज हर्षिताचा सोपा झेल सोडला. हा झेल भारतासाठी गेमचेंजर ठरू शकला असता. या कारणांनी हरमनप्रीतला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
With Women’s T20WC is in Few months
Time for Team India to move on From Harmanpreet Kaur
Today she failed as a batter and Fielder
Also flopped as a captain with so many poor decisions!Imagine Playing 153 T20I Innings Still having the SR Just 107 🤦#WomensAsiaCup pic.twitter.com/VSnVy9WXOV
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) July 28, 2024
आशिया चषक गमावल्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत म्हणाली की, “आम्ही संपूर्ण स्पर्धेत चांगले क्रिकेट खेळलो आणि आज आमच्याकडून खूप चुका झाल्यात यात शंका नाही याचे परिणाम भोगावे लागतील. आमची धावसंख्या चांगली होती. आम्ही पॉवरप्लेमध्ये यश शोधत होतो. पण ते योजनेनुसार झाले नाही आणि श्रीलंकेने खरोखरच चांगली फलंदाजी केली.”
हेही वाचा –
टीम इंडियाचा हार्टब्रेक! आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभव
श्रीलंकेसाठी दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कामिंदू मेंडिस पहिलाच गोलंदाज नव्हे; 28 वर्षांपूर्वीही झालंय असं
IND vs SL : ओल्या मैदानामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या टी20 सामन्याच्या नाणेफेकीला उशीर