---Advertisement---

बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

On: सोमवार, जुलै 19, 2021 5:33 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचा रविवार, 18 जुलै रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस अविस्मरणीय तेव्हा झाला, जेव्हा त्याला एकदिवसीय क्रिकेटची कॅप मिळाली आणि त्याचबरोबर त्याने पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. ईशानच्या या उत्कृष्ट खेळीमुळे त्याचे वडील प्रणव पांडे आणि त्याचा संपूर्ण परिवार खूप आनंदित झाला आहे. आता त्याचे वडील प्रणव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ईशानला क्रिकेटपटू बनवण्यामागे त्याचे वडील प्रणव पांडे यांची महत्वाची भूमिका होती. प्रणव पांडे यांनी मुलाखत देताना सांगितले की, “ज्याप्रकारे ईशानने इंग्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यामध्ये फलंदाजी केली होती. त्याचप्रमाणे तो श्रीलंका विरुद्धही खेळण्यात यशस्वी झाला. त्याचबरोबर या वेळेस त्याला यष्टीरक्षण करण्याची देखील संधी मिळाली आहे. ही संधी त्याच्या कारकिर्दीला पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वकाही ठप्प झाले होते. तेव्हाही ईशानने यष्टीरक्षण आणि फलंदाजीचा सराव सुरूच ठेवला होता. त्याने आपल्या खेळावर खूप मेहनत घेतली होती.”

श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्याने आपले आदर्श महेंद्रसिंग धोनीकडून टीप्स घेतले होते. त्याचेच आता फळ त्याला मिळत आहे. श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ईशानला यष्टिरक्षण करण्याची संधी मिळाली, जो त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ईशानला यष्टीरक्षण करायला मिळाल्यामुळे खूष असलेल्या प्रणव पांडे यांनी सांगितले की, “असंतुलित मैदानामुळे काही वेळा त्याच्या हातून चेंडू निसटला. परंतु प्रत्येकाला चुका सुधारून पुढे जावे लागते. या वर्षाच्या अखेरीस युएईमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी त्याला फलंदाजीसह यष्टिरक्षणावर अजून मेहनत घ्यावी लागेल.”

ईशानला क्रिकेटपटू बनविण्यात हातभार लावणाऱ्या बंधू राजकिशनने सांगितले की, “काही दिवसांपूर्वीच ईशानशी माझा संवाद झाला होता. तो सध्या टी20 विश्वचषकाबद्दल विचार करत नाहीये. श्रीलंकेत चांगली कामगिरी करणे हे त्याचे पहिले लक्ष्य आहे. यानंतर युएईमध्ये त्याला आयपीएल सामने खेळायचे आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर तो युएईहून टी20 विश्वचषक जिंकूनच भारतामध्ये परत येईल.”

महत्त्वाच्या बातम्या-

हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर ‘कोच’ द्रविडने दिली होती का काही प्रतिक्रिया? पृथ्वी शॉने केला खुलासा

दुसऱ्या सामन्यात आणखी तयारीनिशी उतरणार भारतीय संघ, रणतुंगा यांना देणार चोख प्रत्युत्तर

स्टुअर्ट ब्रॉड की हार्दिक पंड्या; कोणाचा हेडबँड लूक हटके? दिग्गज खेळाडूने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---