आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स संघानेने चालू हंगामात खूपच निराशाजनक प्रदर्शन केले आहे. सुरुवातीच्या १२ सामन्यांपैकी फक्त दोन सामने संघाने जिंकले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई यापूर्वीच बाहेर पडली आहे आणि गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. असे असले तरी मुंबईचा सलामीवीर फलंदाज इशान किशनला विश्वास आहे की, संघ चालू हंगामात जरी अपयशी ठरला असला, तरी पुढच्या हंगामात मात्र पुनरागमन करेल. इशनने सांगितल्याप्रमाणे मुंबईसाठी सर्वकाही ठीक होईल.
इशान किशन (Ishan Kishan) याला पुढच्या हंगामात संघाच्या पुनरागमनाविषयी पूर्ण आत्मविश्वास आहे. तो म्हणाला की, “चढ-उतार या खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. होय, आम्ही सामने हारू, असेही सामने असतील, ज्यामध्ये आम्ही चांगले प्रदर्शन करू शकणार नाही. परंतु, आमच्यासाठी जे सर्वात महत्वाचे असेत, ते म्हणजे आम्हाला सर्व गोष्टी स्वतःसाठी कशा पद्धतीने ठीक करता येतील. आम्हाला सामने जिंकायचे आहेत, आम्ही आमचे सर्वश्रेष्ठ देत आहोत. पण दुर्देवाने आम्ही या हंगामात अनेक सामने जवळच्या अंतराने गमावले आहेत. असे होत असते आणि मला वाटते की, आम्ही ही बाब पुढच्या हंगामात ठीक करू.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“स्पर्धेच्या सुरुवातीला मी मैदानात जायचो आणि माझ्या पद्धतीने खेळायचो. मी माझ्या फलंदाजीविषयी अधिक विचार करत नव्हतो. माझे लक्ष्य संघाला चांगली सुरुवात देण्यावर होते. पण मला वाटते की, नंतर कुठे ना कुठे मी खेळ संपवण्याच्या प्रयत्नात असायचो. शक्यतो पहिल्या ६ षटकांमध्ये मी माझा फोकस गमावला. त्यानंतर मी प्रशिक्षक आणि कर्णधारासोबत चर्चा केली. त्यांनी फक्त एवढेच सांगितले की, जर तू चांगली सुरुवात दिली, तर संघासाठी हे मदतगार ठरेल. त्यामुळे तू खेळ संपवण्याचा विचार करण्याची गरज नाहीये. जर खेळपट्टीवर टिकून राहिला, तर तसेही तू हे काम करणारच आहे.” असेही इशान म्हणाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये ‘फ्लॉवर’ समजून बेस प्राईजमध्ये घेतले गेलेले ५ खेळाडू, पण करून दाखवली ‘फायर’ कामगिरी
Video: विजयाचा जल्लोष! वॉर्नरने ‘हाऊज द जोश’ म्हणताच, सहकाऱ्यांनीही मिसळला सुरात सूर