ईशान किशन याने नुकतीच भारताच्या कसोटी संघात जागा मिळवली. त्याने संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना त्याला कसोटी संघात निवडण्यासाठी भाग पाडले. त्याने मागच्या वर्षी म्हणजेच 2022 च्या शेवटी जबरदस्त प्रदर्शन केल्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवडले आहे. भारताचा हा युवा यष्टीरक्षक फलंदाज कसोटी पदार्पणासाठी तयार असून त्याने शुबमन गिल सोबत बोलताना काही खास गोष्टी शेअर केल्या.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर ईशान किशन (Ishan Kishan) आता कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार असून यासाठी उत्सुक देखील आहे. ऑस्ट्रेलिया संघ पुढच्या महिन्यात चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात येणार असून या बलाढ्य संघाविरुद्ध ईशान पादार्पण करू शकतो. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात भारतीय संघासाठी शतक करणाऱ्या शुबमन गिल (Shubman Gill) याने बीसीसीआयसाठी ईशान किशनची मुलाखत घेतली.
ईशान किशन कसोटी क्रिकेटमध्ये केळण्यासाठी नेहमीच उत्सुक राहिला असून याविषयी शुबमन गिलशी बोलताना तो म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. जेव्हा मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करत होतो, तेव्हा माझे वडील नेहमी म्हणायचे की, कसोटी क्रिकेट खरे आव्हान आहे. हे फलंदाजाची गुणवत्ता चाचणी असते आणि देशासाटी कसोटी क्रिकेट खेळणे मोठी गोष्ट आहे.”
Of maiden Test call-up, emotions & excitement to play red-ball cricket & more 👌 👌
🎥 🎥 @ShubmanGill turns anchor to interview @ishankishan51 on his selection in #TeamIndia squad for the first two #INDvAUS Tests 👍 pic.twitter.com/oinLYky95Q
— BCCI (@BCCI) January 17, 2023
ईशान पुढे बोलताना म्हणाला, “त्यामुळे कसोटी संघात जागा मिळाल्यामुळे मी खुश आहे. मी खूप मेहनत करेल. चांगले प्रदर्शन करण्यासाठी मी मेहनत घेईल. संघात निवड झाल्यानंतर मी घरी फोन करून ही आनंदाची बातमी कळवली. अशीच मेहनत करत राहा, असे माझे वडील म्हणाले.” दरम्यान, मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ईशानने बांगलादेशविरुद्ध खेळताना द्विशतक मारले होते. मात्र तरीदेखील त्याला कसोटी संघातून वगळले गेले होते. पण दरम्यानच्या काळात त्याने दोन रणजी सामने खेळले आणि संघात पुन्हा पुनरगामन केले. यावेळी ईशानला कसोटी संघात जागा मिळाली असून भारतासाठी पांढर्या रंगाच्या जर्सीत खेळताना पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(Ishan Kishan is all set to make his Test debut against Australia)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे वादळी शतक, विक्रम मोडणे विराट कोहलीसाठीही अशक्य
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध