भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा हा सध्या वरिष्ठ संघापासून दूर आहे. मागील वर्षीपासून तो कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला. त्याचवेळी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. त्याचवेळी नुकतेच त्याने एका मुलाखतीत बोलताना, आपल्या पंधरा वर्षाच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट क्षण सांगितला.
ईशांत याने मागील वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळलेला. 311 कसोटी बळी नावावर असलेल्या ईशांतने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना कोणता होता याबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला,
“2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला गेलेला मोहाली वनडे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट सामना वाटतो. तो सामना माझ्यामुळेच गमावला गेलेला. त्या पराभवाने मी खूप निराश झालेलो. त्याचवेळी मी माझ्या पत्नीला डेट करत होतो. मी तिला फोन करून मी कसा पराभवासाठी जबाबदार आहे हे सांगायचो आणि रडायचो. जवळपास महिनाभर मी त्याच परिस्थितीत होतो.”
तो पुढे म्हणाला,
“त्यावेळी एक गोष्ट चांगली झाली की माही भाई आणि शिखर माझ्या रूममध्ये आले. त्यांनी मला धीर दिलेला. त्या एका सामन्यामुळे माझी अशी धारणा झाली होती की, मी पांढऱ्या चेंडूने चांगली गोलंदाजी करत नाही.”
ईशांतने सांगितलेल्या सामन्यातील गोष्ट 2013 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील आहे. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 4 षटकात 44 धावांची गरज होती. मात्र, जेम्स फॉकनर याने त्याच्या षटकात 30 धावा वसूल करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला. अखेरीस ऑस्ट्रेलियाने या सामन्यात तीन चेंडू राखून विजय संपादन केला होता.
(Ishant Sharma Reveal His Situation When James Faulkner Hits Him 30 Runs In Over In Mohali ODI 2013)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा